सीपीआर हॉस्पिटल परिसरात रात्री मोठे झाड कोसळले; सुदैवाने जीवितहानी नाही
By समीर देशपांडे | Published: September 27, 2023 09:29 AM2023-09-27T09:29:18+5:302023-09-27T09:29:27+5:30
सकाळपासून उर्वरित झाड कापून हा रस्ता पूर्ण मोकळा करण्याचे काम सुरू होते.
कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या परिसरात रात्री सव्वा बारा वाजता वेदगंगा या इमारती समोरील मोठे झाड कोसळले. रात्रीची वेळ असल्यामुळे जीवित हानी टळली. जर दिवसा झाड कोसळले असते तर मात्र गंभीर प्रसंग निर्माण झाला असता.
रात्री सव्वा बारा वाजता वेदगंगा ट्रामा आयसीयू समोरील हे मोठे झाड कोसळले मोठा आवाज करत झाड कोसळल्यामुळे सुरक्षारक्षक, रुग्णांचे नातेवाईकही या ठिकाणी धावले. यानंतर सुरक्षा रक्षकाने कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाला दूरध्वनी केला आणि घटनेची माहिती दिली. यानंतर तातडीने अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी दाखल झाले आणि तीन जवानांनी रात्री दीड वाजेपर्यंत हे झाड कापून रस्ता मोकळा केला. या झाडाच्या अलीकडे एक रुग्णवाहिका अडकून पडली होती.
सकाळपासून उर्वरित झाड कापून हा रस्ता पूर्ण मोकळा करण्याचे काम सुरू होते. दिवसा या परिसरामध्ये रुग्ण नातेवाईक आणि वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. मोठ्या प्रमाणावर वाने येथे लावलेली असतात. जर दिवसा झाड पडले असते तर मात्र गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागले असते.
ठीक 00:15 वाजता वेदगंगा ट्रामा icu समोरील मोठे झाड कोसळल्याचे ट्रामा येथील सू. र. संतोष कांबळे यांनी कळविल्याने तात्काळ हःसू.र.अनिकेत पाटील सोबत घटनास्थळी पोहचून बघितले असता पुर्ण रस्ता बंद झाल्याने एक ऍम्ब्युलन्स खाली अडकली असल्याने cmo डॉ. वेंकटेश पोवार सर यांनी कळवून कोल्हापूर अग्निशमन दल ला इन्फॉमकेला व घटनास्थळी बोलवून घेतले त्यामधील 3जवाणांनी पुर्ण झाड कटिंग करून रस्त्यावरील अडथळा मोकळा केला.