इन्स्टाग्रामवरील ओळखीतून अल्पवयीन मुलीस नेले पळवून, तरुणास अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 11:59 AM2022-08-27T11:59:07+5:302022-08-27T11:59:40+5:30

लग्नाचे आमिष दाखवून नेले पळवून

A minor girl was abducted from an acquaintance on Instagram, Incident in Ajara Taluka of Kolhapur District | इन्स्टाग्रामवरील ओळखीतून अल्पवयीन मुलीस नेले पळवून, तरुणास अटक

इन्स्टाग्रामवरील ओळखीतून अल्पवयीन मुलीस नेले पळवून, तरुणास अटक

Next

आजरा : इन्स्टाग्रामवरील ओळखीतून मासेवाडी ( ता. आजरा ) येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी कोणोलीपैकी असंडोली ( ता. राधानगरी ) येथील सूरज संभाजी सुतार ( वय २३ ) याला आजरा पोलिसांनी अटक केली आहे. पोस्को कायद्यांतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्याला आज न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.

पोलिसातून मिळालेली माहिती अशी, सूरज सुतार हा सुतारकाम करतो. त्याचे गेल्या आठ महिन्यांपासून इन्स्टाग्रामवर मासेवाडी येथील अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. या ओळखीतून आठ दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीला सूरजने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. तिच्याशी गेले आठ दिवस शारीरिक संबंध ठेवले. याबाबत मुलीच्या कुटुंबीयांनी आजरा पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यावरून आजरा पोलिसांनी अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले तर सूरजला अटक केली.

अल्पवयीन मुलीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. तर सूरज सुतार याच्याविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे, सहायक फौजदार बिराप्पा कोचरगी, पोहेकाॅ सुनील म्हसवेकर, राजेश आंबुलकर, अमोल पाटील करीत आहेत.

Web Title: A minor girl was abducted from an acquaintance on Instagram, Incident in Ajara Taluka of Kolhapur District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.