Kolhapur Crime: घरासमोरील पार्किंगचा वाद अन् स्मशानभूमीत मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल 

By उद्धव गोडसे | Published: March 8, 2023 03:57 PM2023-03-08T15:57:52+5:302023-03-08T15:59:10+5:30

कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील घटना

A person was beaten due to a parking dispute in front of the house in kolhapur, A case has been registered against three | Kolhapur Crime: घरासमोरील पार्किंगचा वाद अन् स्मशानभूमीत मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल 

Kolhapur Crime: घरासमोरील पार्किंगचा वाद अन् स्मशानभूमीत मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल 

googlenewsNext

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील मरगाई तालमीजवळ घरासमोर दुचाकी पार्क करण्याच्या कारणावरून शनिवारी (दि. ४) दोन कुटुंबात वाद झाला होता. त्या वादाचा राग मनात धरून सोमवारी (दि. ६) रात्री उशिरा तिघांनी शैलेंद्र पांडुरंग कदम (वय ४७, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) यांना पंचगंगा स्मशान घाट येथे मारहाण केली.

जखमी शैलेंद्र कदम यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, घरासमोर दुचाकी लावल्याच्या कारणातून फिर्यादी कदम यांच्या आई शकुंतला पांडुरंग कदम आणि शेजारी राहणाऱ्या मालोबाई शंकर ढाले यांच्यात शनिवारी वाद झाला. तो वाद आपसात मिटवला होता. 

मात्र, घराशेजारी राहणाऱ्या एका वृद्धेचे निधन झाल्यानंतर सोमवारी रात्री पंचगंगा स्मशान घाटावर गेलेले शैलेंद्र कदम यांना पार्किंगच्या वादाचा जाब विचारत, सिद्धांत शरद ढाले याच्यासह तिघांनी काठीने मारहाण केली. याबाबत पोलिसांनी सिद्धांत ढाले याच्यासह इतर अनोळखी दोघांवर गुन्हा दाखल केला.

Web Title: A person was beaten due to a parking dispute in front of the house in kolhapur, A case has been registered against three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.