कोल्हापुरात पोलिसांच्या पेट्रोल पंपावर पोलिसास मारहाण, दोघे जखमी

By उद्धव गोडसे | Published: December 19, 2023 05:37 PM2023-12-19T17:37:45+5:302023-12-19T17:39:35+5:30

पैशाच्या वादातून मारहाण

A policeman was beaten up at a police petrol pump in Kolhapur | कोल्हापुरात पोलिसांच्या पेट्रोल पंपावर पोलिसास मारहाण, दोघे जखमी

संग्रहित छाया

कोल्हापूर : पोलिस मुख्यालयातील पोलिसांच्या पेट्रोल पंपावर पैशाच्या वादातून चौघांनी ड्युटीवर असलेल्या साध्या वेशातील पोलिस कर्मचा-यास मारहाण केली. सोमवारी (दि. १८) रात्री बाराच्या सुमारास झालेल्या घटनेत कॉन्स्टेबल अल्ताफ वाहीद कुरेशी (नेमणूक नियंत्रण कक्ष) यांच्यासह पेट्रोल पंपावरील कर्मचारी किरण रवी आवळे (वय २३, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) हे दोघे जखमी झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री बाराच्या सुमारास एक कार डिझेल भरण्यासाठी आली. त्यावेळी कारमधील चौघांनी पैशांवरून कर्मचारी किरण आवळे याच्याशी वाद घातला. ड्युटीवर असलेले कर्मचारी अल्ताफ कुरेशी यांनी चौघांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी धक्काबुक्की केली. तसेच निघून जाताना दगडफेक केली. या दगडफेकीत कुरेशी आणि आवळे यांना दुखापत झाली.

जखमींवर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले. शाहूपुरी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, मारहाण करणा-या चौघांचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी सांगितले.

Web Title: A policeman was beaten up at a police petrol pump in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.