हातकणंगेतील केंद्रांवर समान मतांची पोस्ट हा खोडसाळपणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 09:24 PM2024-06-07T21:24:32+5:302024-06-07T21:24:45+5:30

जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण : फॉरवर्ड करणाऱ्यावर कारवाई

A post of similar opinions on wristband centers is a hoax | हातकणंगेतील केंद्रांवर समान मतांची पोस्ट हा खोडसाळपणा

हातकणंगेतील केंद्रांवर समान मतांची पोस्ट हा खोडसाळपणा

इंदुमती सूर्यवंशी,  लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील काही मतदान केंद्रांवर स्वाभिमानी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डी. सी. पाटील यांना समान मते असलेली पोस्ट व्हायरल करणे हा जाणीवपूर्वक कॉपी-पेस्ट करून केलेला खोडसाळपणा आहे. असा कोणताही प्रकार प्रत्यक्षात त्या केंद्रांवर झालेला नाही. हे कुणी केले याचा शोध घेण्यास पाेलिसांना सांगितले असून ही चुकीची माहिती फॉरवर्ड करू नये अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांनी शुक्रवारी दिला.
हातकणंगलेमधील ओकोली, करंजोशी, ससेगाव, चनवाड, सवते, वडगाव, सावे, जुळेवाडी, भैरवाडी, शिराळे तर्फ मलकापूर, थेरगाव, सरुड, चरण आदी गावांतील सुमारे ४२ मतदानकेंद्रांवर शेट्टी व डी. सी. पाटील यांना समान मते पडल्याची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. निवडणूक यंत्रणेकडून या चुका झाल्या आहेत का..? असा प्रश्न निर्माण करून यंत्रणेबाबत संशयाचे वातावरण निर्माण करण्यात आले. यााबाबत विचारले असता जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, असा कोणताही प्रकार या केंद्रावरील मतमोजणीत झालेला नाही. कोणत्या केेंद्रावर किती मते पडली व प्रत्यक्षात झालेली मतमोजणी यांचा आकडा जुळल्याशिवाय मतमोजणी करणारे अधिकारी-कर्मचारी पुढील मतमोजणी करत नाहीत. मतमोजणी दिवशी प्रत्येक उमेदवाराचे मतमोजणी प्रतिनिधी त्याठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक झाली असून व्हायरल पोस्टमध्ये काहीही तथ्य नाही. जाणीवपूर्वक हे कॉपी पेस्ट केले आहे. हे कोणी केले याचा शोध पोलिस घेतीलच पण नागरिकांनी ही चुकीची माहिती फॉरवर्ड करू नये. दरम्यान हातकणंगलेचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे यांनी या सर्व केंद्रांवरील मतमोजणीच्या आकडेवारीचा चार्टच प्रसारमाध्यमांना देऊन वस्तुस्थिती स्पष्ट केली.
--

केंद्र क्र : शेट्टी, डी. सी. पाटील यांची प्रत्यक्ष मते : व्हायरल पोस्टमधील डी. सी. पाटील यांची मते
७३ : १७ : ० : १७

८० : २२ : ४ : २२
११३ : १८ : ७ : १८

१२५ : २ : १ : ४
१३३ : ५६ : ० : ५६

१४२ : २० : २ : २०
(पोस्टमध्ये राजू शेट्टी यांना मिळालेल्या मतांचाच आकडा कॉपी पेस्ट करून डी. सी. पाटील यांच्या नावापुढे जोडला आहे.)

Web Title: A post of similar opinions on wristband centers is a hoax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.