शाळेचे लोखंडी गेट अंगावरून पडून शाळकरी मुलाचा मृत्यू, मुख्याध्यापकांसह शिक्षकांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 05:48 PM2024-11-22T17:48:12+5:302024-11-22T17:48:23+5:30
सीसीटिव्हीमुळे बनाव उघडकीस
सरदार चौगुले,करवीर-केर्ले ता.करवीर येथील कुमार कन्या विद्यामंदिर शाळेचे लोखंडी गेट अंगावरून पडून स्वरूप दिपकराज माने या शाळकरी मुलाच्या मृत्यू प्रकरणी शाळेतील शिक्षिका वंदना रामचंद्र माने, मुख्याध्यापक कृष्णात शामराव माने रा.राजाराम कॅालनी, कसबा बावडा, कोल्हापूर) यांच्यावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. घडलेला गुन्हा शिक्षिकेसह मुख्याध्यापकांसमोर घडलेला असताना सुध्दा तपासा दरम्यान शाळेतून दिशाभूल करणारे माहिती पोलिसांनी दिली गेली होती. करवीर पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज तपासल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. गुन्हा करूनही दिवसभर शाळेत सभ्यतेचा आव आणणाऱ्या शिक्षिकेच्या हालगर्जीपणामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने पालक संताप व्यक्त करत आहे.
गुरूवारी शाळेला उशीराने आलेल्या शिक्षिकेनी मुख्याध्यापकांची दुचाकी शाळेत घेण्यासाठी स्वरूपला गेटचा दरवाजाचे बांधणे सोडून दरवाजा बाजूला सरकविण्यास सांगितले होते.क्षमतेपेक्षा जड असलेल्या दरवाजाचे बांधणे सोडून दरवाजा बाजूला सरकविताना दरवाजा त्याच्या अंगावर पडल्याने तो गंभीर जखमी झाला.ही घटना शिक्षकांच्या समोर घडली असताना सुध्दा त्यांनी मतदानाचा पेट्या नेण्यासाठी गेटचा दरवाजा अडकबन ठेवला असल्याची खोटी माहिती सुरूवातीला दिली;परंतू सीसीटिव्ही फुटेजमधून शिक्षिकेने काम लावलेचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी शिक्षिका आणि मुख्याध्यापकांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
शाळेत घडलेला घटना दुर्दैवी असल्याने शाळेला दोन दिवस सुट्टी देण्यात आली आहे.करवीर पोलिसांनी शुक्रवारी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.या घटनेची फिर्यात चुलते विक्रमसिंह माने यांनी पोलिसात दिली आहे.
सीसीटिव्हीमुळे बनाव उघडकीस
शाळेला उशीरा आलेल्या मुख्याध्यापक व शिक्षिकेने त्याला गेटची दोरी सोडून दरवाजा बाजूला करण्यास सांगितल्याचे सासीटिव्ही फुटेजमधून समोर आले.गुन्हा घडला त्यावेळी घटनास्थळी घटनेबाबत संभ्रम निर्माण करणारी माहिती शाळेकडून सांगितली जात होती.त्यामुळे सीसीटिव्ही फुटेज तपासल्यानंतर त्या शिक्षिकेचा बनाव उडकीय आला असल्याची माहिती करवीर पोलिसांनी सांगितली.