वाघबीळ घाटात भरधाव कार शंभर फुट दरीत कोसळली, चार जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 04:57 PM2023-05-07T16:57:20+5:302023-05-07T16:57:44+5:30

सरदार चौगुले - कोल्हापूर -रत्नागिरी रोडवरील वाघबीळ घाटातील उतरणीच्या धोकादायक दुसऱ्या वळणावर कोल्हापूरकडे जाताना चारचाकी गाडीच्या चालकाला वळण समजले ...

A speeding car fell into a hundred feet ravine in Waghbeel Ghat, four injured | वाघबीळ घाटात भरधाव कार शंभर फुट दरीत कोसळली, चार जखमी

वाघबीळ घाटात भरधाव कार शंभर फुट दरीत कोसळली, चार जखमी

googlenewsNext

सरदार चौगुले -

कोल्हापूर-रत्नागिरी रोडवरील वाघबीळ घाटातील उतरणीच्या धोकादायक दुसऱ्या वळणावर कोल्हापूरकडे जाताना चारचाकी गाडीच्या चालकाला वळण समजले नाही, यामुळे भरधाव कार शंभर फुट दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. हा अपघात रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडला. याची नोंद लक्ष्मीपूरी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

इम्रान मुशताक सुंडके (वय ३९), महमहअली नुरअहमद बिजापूर (वय ३२), इम्रान शरीफ बागवान (वय २४), शाकिर मुन्ना कितुर (वय २६, सर्वजण रा.हुबळी जि.धारवाड) अशी चौघा जखमींची नावे आहेत. लक्ष्मीपूरीतील खाजगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वरील सर्व जखमी कर्नाटक राज्यातील हुबळी येथील असून ते विशाळगडला देवदर्शनासाठी गेले होते.रविवारी पहाटे विशाळगडहून गावाकडे येत असताना पाचच्या सुमारास वाघबीळ घाटातील उतरणीची दुसऱे वळण चालकाच्या लक्षात आले नसल्याने ताबा सुटलेली चारचाकी गाडी थेट दरीत कोसळली.गाडी झाडावर आदळत खाली दरीत गेल्याने चेपली आहे.सुदैवाने अपघातात जीवितहानी झालेली नाही.जखमींना खाजगी रूग्नवाहिकेतून कोल्हापूर येथे उपचारासाठी नेण्यात आले.

संरक्षक कटडा असता तर… -
वाघबीळ घाटाच्या दुसऱ्या वळणावरील संरक्षक कटडा तुटून दहाबारा वर्ष झाले आहे.याच ठिकाणी दरम्यानच्या काळात चारवेळा गाड्या दरीत जाऊन अपघात झाले आहे.सुरक्षेच्या दृष्टीने या धोकादायक जागी संरक्षक कटडा बांधलेला नाही की बॅरेकेटस् लावलेले नाही.वाघबीळ घाटात ठिकठिकाणी संरक्षक कटडे ढासाळलेल्या अवस्थेत आहे.याकडे संबधित विभागाचे दुर्लक्ष आहे.या ठिकाणी संरक्षक कटडा असतातर गाडी कटड्यामुळे दरीत गेली नसती.अशी चर्चा घटनास्थळी होती.
 

 

Web Title: A speeding car fell into a hundred feet ravine in Waghbeel Ghat, four injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.