भरधाव कारची कंटेनरला पाठीमागून धडक; अयोध्येहून परतताना कोल्हापूर, सांगलीचे चौघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 04:06 PM2024-07-09T16:06:57+5:302024-07-09T16:07:53+5:30

बांबवडे (जि. कोल्हापूर ):  अयोध्येहून परतताना झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूर , सांगलीचे चौघे जागीच ठार झाले. मृतांमध्ये शाहुवाडी तालुक्यातील एकाचा समावेश आहेत. मध्यप्रदेश ...

A speeding car hits a container from behind, Two people from Kolhapur were killed while returning from Ayodhya | भरधाव कारची कंटेनरला पाठीमागून धडक; अयोध्येहून परतताना कोल्हापूर, सांगलीचे चौघे ठार

भरधाव कारची कंटेनरला पाठीमागून धडक; अयोध्येहून परतताना कोल्हापूर, सांगलीचे चौघे ठार

बांबवडे (जि. कोल्हापूर):  अयोध्येहून परतताना झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूर, सांगलीचे चौघे जागीच ठार झाले. मृतांमध्ये शाहुवाडी तालुक्यातील एकाचा समावेश आहेत. मध्यप्रदेश येथे काल, सोमवारी (दि.८) हा अपघात झाला.

अपघातात दिलदार तांबोळी (वय-६५, रा. शाहुवाडी, जि. कोल्हापूर), रमिला अत्तार (३०), अमिन अत्तार (३५, दोघे रा. तासगाव) व भगवान पवार (३२, रा. सोलापूर) या चौघांचा मृत्यू झाला. तर अनिल पाटील (रा. शाहुवाडी) हे गंभीर जखमी झाले. जखमीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोल्हापूर सांगली व सोलापूर जिल्ह्यातील एकाच कंपनीत काम करणारे पाच जण मध्यप्रदेशात कामानिमित्त गेले होते. काम आटोपून अयोध्या दर्शन करून परत येत असताना सोमवार सकाळच्या दरम्यान पाचोर सारंगपूरच्या जवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरला कारची जोरात धडक झाली. 

यात दिलदार तांबोळी, रमिला अत्तार, अमिन अत्तार व भगवान पवार या चौघांचा मृत्यू झाला. तर अनिल पाटील हे गंभीर जखमी झाले. जखमीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमीवर पचोर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

या भीषण अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. पोलिसांनी कारचा दरवाजा तोडून सर्वांना बाहेर काढले. अपघाताचे वृत्त समजतात तांबोळी व पाटील यांचे कुटुंबीय विमानाने घटनास्थळी रवाना झाले.

Web Title: A speeding car hits a container from behind, Two people from Kolhapur were killed while returning from Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.