Kolhapur: खासगी बस धावत्या कारवर आदळली, ३९ जण किरकोळ जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 05:04 PM2024-04-15T17:04:35+5:302024-04-15T17:04:46+5:30

धोकादायक वळणावर नियंत्रण सुटल्याने अपघात

A speeding private bus overturned on a running car in kolhapur | Kolhapur: खासगी बस धावत्या कारवर आदळली, ३९ जण किरकोळ जखमी 

Kolhapur: खासगी बस धावत्या कारवर आदळली, ३९ जण किरकोळ जखमी 

पेठवडगाव : राष्ट्रीय महामार्गावरील मंगरायाचीवाडी फाट्याजवळ भरधाव खासगी बस धावत्या कारवर उलटल्याने दोन्ही वाहनातील ३९ जण किरकोळ जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास झाला. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. महामार्गावरील धोकादायक वळणावर नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातामुळे काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती.

या अपघातात हर्षा आवल रेड्डी (वय ३२, मोशी, पुणे), जयश्री हर्षा रेड्डी (वय २९), मनोहर किसन वंजारी (वय ७२, रा.विश्रांतवाडी, आळंदी रोड, पुणे), तेजस मनोहर वंजारी, अशोकराव राखे यांना गंभीर दुखापत झाली आहे. इतर ३४ प्रवासी किरकोळ जखमी झालेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अधिक माहिती अशी, ऑरेंज ट्रॅव्हर्स (नं.ए.आर.०२;४६४८) बंगळुरूहून पुणेकडे ३४ प्रवासी घेऊन जात होते, तर कारमधून (एम.एच.१२,के.ई.३६२१) पाचजण पुण्यास निघाले होते. दरम्यान, क्लासिक पेट्रोल पंपाच्या पुढे मंगरायाचीवाडी फाट्याला महामार्गाचे रुंदीकरणाचे रस्त्याचे काम सुरू आहे. या जागी डिव्हायडरने रस्ता वळवलेला आहे. रस्त्याला उतार असल्यामुळे बस (ट्रॅव्हलर्स) भरधाव वेगाने जात होती. यावेळीमधील डिव्हायडर चालकाच्या लक्षात आला नाही. यामुळे त्याने वेगाने त्या डिव्हायडरवर बस चढली.

यामध्ये धडकेमुळे बस उलटली आणि थेट धावत्या कारवर पडली. यावेळी बसमधील ३४ प्रवासी बसच्या आतल्या आत धडक होऊन जखमी झाले. प्रवाशांची आरडा-ओरड केला. अनेक प्रवाशांना डोक्यास, डोळ्यास मुक्का मार लागला. याशिवाय प्रवाशांचे साहित्य इतरत्र विस्कटले. दरम्यान, चालकाशेजारी बसलेले अशोकराव राखे हे बसमधून बाजूला पडल्याने दुखापत झाली.

या घटनेची माहिती वडगाव पोलिसांना कळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक अनिता पवार, रियाज मुल्लाणी, पतंगराव रेणुसे, रामराव पाटील, महेश गायकवाड, अंजना चव्हाण यांनी तत्काळ मदत सुरू केली. जखमींना उपचारासाठी हलविले व वाहणे रस्त्यातून बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. दरम्यान, पोलिस येण्यापूर्वीच काही प्रवासी व नागरिकांनी मदत करून उपचारासाठी अत्यावश्यक रुग्णवाहिकेतून हलविले. कारमधील अडकलेल्यांना नागरिकांनी बाहेर काढले. सुदैवाने कारमधील पाचही प्रवासी बचावले. तपास पोलिस निरीक्षक विलास भोसले करीत आहेत.

Web Title: A speeding private bus overturned on a running car in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.