फोटो एडीट करुन मशिदीवर भगवा झेंडा असलेला लावला स्टेटस, आठ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 05:49 PM2022-10-06T17:49:27+5:302022-10-06T17:53:01+5:30
याप्रकारानंतर करोशी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
चिकोडी : नवरात्रीनिमित काढण्यात आलेल्या दुर्गामाता दौडच्या फोटोत एडीट करून मशिदीवर भगवा झेंडा लावून मोबाईलवर स्टेटस लावल्याने चिकोडी तालुक्यातील करोशी गावात तणाव निर्माण झाला. याप्रकरणी आठ युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करोशी येथे मागील ४ वर्षांपासून दुर्गामाता दौड काढली जाते. यंदा देखील गावातील तरुणांनी दौड पार पाडली. पण यावेळी काढण्यात आलेल्या फोटोत मशिद दिसत असून मशिदीच्या मिनारावर भगवा झेंडा एडिट करून लावण्यात आला आहे. तसेच तो फोटो व्हॉटसअपवर स्टेटस ठेवण्यात आला. यामुळे गावातील संतप्त दुसऱ्या समुदायाच्या बांधवांनी चिकोडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
याप्रकरणी धार्मिक तेढ व अशांतता भंग आरोपाखाली ८ युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेले नाही. याप्रकारानंतर करोशी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. चिकोडी डीवायएसपी बसवराज यलीगार, सीपीआय आर आर पाटील, पीएसआय यमनापा मांग यांनी पोलिस स्थानकात हिंदू-मुस्लिम समाजाच्या नेत्यांची बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले.