केमिकलने भरलेला टँकर गाव तळ्यात पडला; हँड ब्रेक निसटल्याने झाली दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2023 11:11 PM2023-04-18T23:11:37+5:302023-04-18T23:14:18+5:30

गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे येथील पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली

A tanker loaded with chemicals fell into the village lake; The accident happened due to hand brake slipping | केमिकलने भरलेला टँकर गाव तळ्यात पडला; हँड ब्रेक निसटल्याने झाली दुर्घटना

केमिकलने भरलेला टँकर गाव तळ्यात पडला; हँड ब्रेक निसटल्याने झाली दुर्घटना

googlenewsNext

मोहन सातपुते

उचगाव - पुणे -बंगलोर राष्ट्रीय महामार्ग वरील उजळाईवाडी तालुका करवीर येथील विमानतळ रोड वरील गाव तळ्यात एका गॅरेज मध्ये हवा भरण्यास थांबलेल्या मोलासिसने भरलेला मालट्रक (केमिकल) भरलेला टँकर एम एच -१० सी क्यू -२८४९ हॅड ब्रेक वरील ताबा सुटल्याने टँकर गाव तळ्यात पाच फूट खोल पाण्यात पडला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाहीं. टँकर चालक पेठ नाका येथील आहे. सदरचे केमिकल हे धोकादायक नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

सायंकाळी वाहतूक करता यावी म्हणून टँकर चालक आपल्या ताब्यातील मोलासिसने भरलेला मालट्रक (केमिकल) टँकर चाकात हवा भरण्यासाठी येथील गाव तळ्याजवळील मोटर गॅरेज मध्ये टँकर थांबवून हवा भरत होता. अचानक टँकरचा हॅड ब्रेक निसटल्याने टँकर समोरील गाव तळ्याचे दगडी पायऱ्या वरून तळ्याच्या पाण्यात कोसळला. टँकर ची समोरील बाजू पाच फूट पाण्यात रुतली होती. तर टँकर चे एक चाक निखळून पडले होते. 

दरम्यान गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे येथील पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. आजूबाजूला असलेली लोकांची गर्दी पांगवली आहे.  या टँकरचे मालक सचिन सुभाष पाटील मूळ गाव (नेरले ता. वाळवा) असे  असून चालक समीर संजय गुरव (मूळ गाव नेरले ता. वाळवा) असे आहे. टँकर मध्ये चालक नसल्याने मोठी दुर्घटना घडली असती. रात्री उशिरा पर्यंत क्रेंनच्या सहायाने टँकर ला बाहेर काढण्यात येत होते.

घटना रात्रीची घडली पण दिवसांची घडली असती तर मोठी जीवित हानी झाली असती. सकाळीं व संध्याकाळी कपडे व जनावरे धुण्यासाठी तळ्यावर गर्दी असते. अशी चर्चा लोकांमधून होत होती.

 

Web Title: A tanker loaded with chemicals fell into the village lake; The accident happened due to hand brake slipping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.