लग्नाचे आमिष दाखवून अत्याचारासह साडेतीन लाखांची तृतीयपंथीची केली फसवणूक, एकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 11:50 AM2022-10-31T11:50:10+5:302022-10-31T11:50:37+5:30

शिवाय त्याने दागिनेही काढून घेतल्याचा आरोप करून संशयितासोबत अन्य दोन अनोळखी मित्रांनीही आपल्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले

A third party was cheated of three and a half lakhs with torture by pretending marriage in kolhapur | लग्नाचे आमिष दाखवून अत्याचारासह साडेतीन लाखांची तृतीयपंथीची केली फसवणूक, एकावर गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचारासह साडेतीन लाखांची तृतीयपंथीची केली फसवणूक, एकावर गुन्हा दाखल

googlenewsNext

जयसिंगपूर : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचारासह साडेतीन लाख रुपये घेऊन एका तृतीयपंथीची फसवणूक केल्याप्रकरणी हेरले (ता. हातकणंगले) येथील एकावर गुन्हा दाखल झाला आहे. ऋषिकेश बबन परमाज असे संशयिताचे नाव असून त्याच्यासह अन्य दोघांविरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात पीडिताने तक्रार दिली आहे.

याबाबत माहिती अशी, ३४ वर्षीय तृतीयपंथी हा आई, वडील व लहान भावासह राहत आहे. संशयित ऋषिकेश याच्याशी ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण झाले होते. लग्नाचे आमिष दाखवून संशयिताने इच्छेविरुद्ध संबंध ठेवले. यावेळी विश्वास संपादन करून व्यवसायासाठी साडेतीन लाख रुपये ऋषिकेश याने पीडिताकडून घेतले शिवाय त्याने दागिनेही काढून घेतल्याचा आरोप करून संशयितासोबत अन्य दोन अनोळखी मित्रांनीही आपल्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले असून सन २०१८ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: A third party was cheated of three and a half lakhs with torture by pretending marriage in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.