जोतिबा डोंगरावर पट्टेरी वाघ आढळला, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 12:15 PM2022-09-22T12:15:30+5:302022-09-22T12:15:55+5:30
जोतिबा मुख्य रस्ता बंद केल्याने गाय मुख वळण मार्गावरुन सद्या वाहतूक सुरू आहे.
जोतिबा: जोतिबा डोंगराच्या पायथ्याला पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जोतिबा डोंगराच्या पायथ्याला असणाऱ्या धडसाचे खळे परिसरात पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे. वाघाच्या दहशतीमुळे नागरीकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जोतिबा डोंगरच्या पायथ्याला असणाऱ्या धडसाचे खळे परीसरात गेल्या अनेक वर्षापासून वाघाच्या वास्तव्याची दगडी घळ आहे. बुधवारी सांयकाळी गावातील राजू बुणे यांनी प्रत्यक्षदर्शनी वाघाला पाहिले. परिसरातील शेतकऱ्यांनी मोबाईलमध्ये वाघाचे फोटो काढलेत. परिसरात बिबट्यानंतर पट्टेरी वाघ आढळल्याने रहिवाशांमध्ये भितीचे वतावरण निर्माण झाले आहे.
यापरिसरात मोठी शेती असून शेतकरी, जनावरे व भाविक, पर्यटकांचा वावर असतो. जोतिबा मुख्य रस्ता बंद केल्याने गाय मुख वळण मार्गावरुन सद्या वाहतूक सुरू आहे. याच मार्गावर या वाघाचे दर्शन झाल्याने वन विभागाने तातडीने पिंजरा लावून या वाघाला सुरक्षित अधिवासात सोडावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.