Gram Panchayat Election: कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्याच दिवशी एकूण २५७ अर्ज दाखल, 'या' तालुक्यात एकही अर्ज नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 03:57 PM2022-11-29T15:57:35+5:302022-11-29T15:59:00+5:30

सर्वाधिक ग्रामपंचायती राधानगरी तालुक्यातील ६६ असल्याने तेथील स्थानिक नेत्यांच्या प्रतिष्ठा पणास लागल्या आहेत.

A total of 257 applications were filed for Gram Panchayat elections in Kolhapur district on the first day itself | Gram Panchayat Election: कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्याच दिवशी एकूण २५७ अर्ज दाखल, 'या' तालुक्यात एकही अर्ज नाही

Gram Panchayat Election: कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्याच दिवशी एकूण २५७ अर्ज दाखल, 'या' तालुक्यात एकही अर्ज नाही

Next

कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, सोमवारी पहिल्याच दिवशी सरपंचपदासाठी तब्बल ११९ अर्ज तर सदस्यपदांसाठी १३८ अर्ज दाखल झाले. गगनबावडा तालुक्यात सरपंच व सदस्यपदासाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही. शुक्रवार (दि. २ डिसेंबर) पर्यंत अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे.

जिल्ह्यातील ४७४ ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. गावगाड्यातील राजकारणाने गती घेतली असून त्यामुळे तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व्यवस्था केली आहे. सर्वाधिक ग्रामपंचायती राधानगरी तालुक्यातील ६६ असल्याने तेथील स्थानिक नेत्यांच्या प्रतिष्ठा पणास लागल्या आहेत. सोमवारी पहिल्या दिवशी जिल्ह्यातून ११९ उमेदवारांनी तेवढेच म्हणजे ११९ अर्ज दाखल केले आहेत. सदस्यपदासाठी १३८ अर्ज दाखल केले असून आज, मंगळवारपासून अर्जांचा ओघ वाढणार आहे.

बिनविरोधसाठी जोडण्या....

अनेक गावात ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाली आहे. जेवढ्या जागा तेवढेच अर्ज कसे दाखल होतील, यासाठी स्थानिक नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत. काही ठिकाणी अर्ज भरल्यानंतर माघारीपर्यंत बिनविरोधसाठी प्रयत्न होणार आहेत.

इच्छुकांची संख्या पाहता दमछाक होणार

पहिल्याच दिवशी आलेल्या अर्जांची संख्या पाहता इच्छुकांची संख्या वाढणार हे निश्चित आहे. त्यामुळे पॅनेल बांधणी करताना स्थानिक नेत्यांची पुरती दमछाक होणार आहे.

तालुकानिहाय असे अर्ज दाखल -

तालुका             ग्रामपंचायती सरपंचपद सदस्यपद
शाहूवाडी ४९ १४०५
पन्हाळा ५००८ २९
हातकणंगले३९१२ १७
शिरोळ १७ ०६०४
करवीर५३ २० २७
गगनबावडा २१ ० 
राधानगरी ६६१८१८
कागल२६०७०४
भुदरगड४३ १४ १०
आजरा३६०९१५
गडहिंग्लज ३४१००७
चंदगड४००१०२

Web Title: A total of 257 applications were filed for Gram Panchayat elections in Kolhapur district on the first day itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.