Kolhapur: ट्रकमध्ये भंगार असल्याचे सांगितले, मिळाली ७२ लाखांची दारू

By उद्धव गोडसे | Published: October 31, 2023 05:05 PM2023-10-31T17:05:41+5:302023-10-31T17:07:24+5:30

सावंतवाडीजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई

A truck carrying Goa-made liquor was caught by the Divisional Bharari Squad of the State Excise Department, claiming that it was transporting scrap | Kolhapur: ट्रकमध्ये भंगार असल्याचे सांगितले, मिळाली ७२ लाखांची दारू

Kolhapur: ट्रकमध्ये भंगार असल्याचे सांगितले, मिळाली ७२ लाखांची दारू

कोल्हापूर : भंगाराची वाहतूक करीत असल्याचे सांगून ७२ लाखांची गोवा बनावटीची दारू घेऊन जाणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने पकडला. संशयित ट्रकचालक जगदीश देवाराम बिश्नोई (रा. भाटीप, जि. जालोर, राजस्थान) याला पथकाने अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. ३०) पहाटे इन्सुली (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) येथे झाली.

सावंतवाडीमार्गे गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्कचे विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर यांना मिळाली होती. त्यानुसार भरारी पथकाने सावंतवाडीजवळ इन्सुली येथे सापळा लावला होता. पथकाने सोमवारी पहाटे संशयित ट्रक अडवला. चालकाकडे चौकशी केली असता, त्याने भंगाराची वाहतूक करीत असल्याचे सांगितले. मात्र, झडती घेतल्यानंतर ट्रकमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे एक हजार बॉक्स आढळले. यातील ४८ हजार बाटल्यांची किंमत ७२ लाख रुपये आहे. पथकाने दारूचा साठा आणि ३० लाखांचा ट्रक असा सुमारे एक कोटी दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

ट्रकचालक बिश्नोई याला अटक केली असून, त्याने मद्यसाठा कोणाकडून आणला आणि पुढे कोणाला पाठवला जाणार होता, याचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती विभागीय उपायुक्त चिंचाळकर यांनी दिली. ही कारवाई सिंधुदुर्गचे प्रभारी अधीक्षक वैभव वैद्य, निरीक्षक संजय मोहिते, तानाजी पाटील, प्रदीप रास्कर, गोपाळ राणे, दीपक वायदंडे, प्रसाद माळी, रणजीत शिंदे यांच्या पथकाने केली.

Web Title: A truck carrying Goa-made liquor was caught by the Divisional Bharari Squad of the State Excise Department, claiming that it was transporting scrap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.