चुना मागण्यावरुन झाला राडा, तुंबळ हाणामारीत एकाचा मृत्यू; राधानगरी तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 10:52 AM2022-03-12T10:52:28+5:302022-03-12T10:56:46+5:30
धामोड : धामोड व कुंभारवाडी ( ता. राधानगरी ) येथील तरुणांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे पडसाद तुंबळ हाणामारीत झाले. यामध्ये ...
धामोड : धामोड व कुंभारवाडी ( ता. राधानगरी ) येथील तरुणांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे पडसाद तुंबळ हाणामारीत झाले. यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अनिल रामचंद्र बारड ( वय ४७ ) असे या मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना कुंभारवाडी येथे मध्यरात्री घडली. दोन्ही गटाच्या तरुणांनी एकमेकावर धावून जात जोरदार हाणामारी झाल्याने हा प्रकार घडला.
घटनेबाबत प्राथमिक माहिती अशी की, जितेंद्र केरबा खामकर (खामकरखाडी ) व विकास नाथाजी कुंभार (कुंभारवाडी ) या दोघांमध्ये तंबाखू लावण्यासाठी चुना मागितला. तु माझ्याकडेच चुना का मागितला या कारणावरून दोघांच्यात हाणामारी झाली. या हाणामारीत जितेंद्र खामकर याचा मामा अनिल बारड याच्यावर चाकूने गंभीर वार झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. राधानगरी पोलिसांत गुन्हा नोंदीचे काम सुरू आहे.