प्रेम प्रकरणातून शिरोली येथे तरुणाची निर्घृण हत्या, शुक्रवारी मध्यरात्रीची घटना

By उद्धव गोडसे | Published: June 15, 2024 01:50 PM2024-06-15T13:50:53+5:302024-06-15T13:51:27+5:30

खुन झालेला तरूण हा पाडळी ता. हातकणंगले येथील होता. तो सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रयत्न करत होता. 

A young man was brutally murdered in Shiroli over a love affair, an incident at midnight on Friday | प्रेम प्रकरणातून शिरोली येथे तरुणाची निर्घृण हत्या, शुक्रवारी मध्यरात्रीची घटना

प्रेम प्रकरणातून शिरोली येथे तरुणाची निर्घृण हत्या, शुक्रवारी मध्यरात्रीची घटना

शिरोली : येथील सांगली फाटा येथे प्रेम प्रकरणातून तरूणीच्या नातेवाईकांनी धारधार शस्त्राने सपासप वार करून तरूणाचा निर्घृण खून केला . ही घटना शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास  पुणे- बेंगलूर राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी पुलाची शिरोलीतील ( सांगली फाटा) बुधले मंगल कार्यालय येथे घडली. खुन झालेला तरूण हा पाडळी ता. हातकणंगले येथील होता. तो सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रयत्न करत होता. 

घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मयत तरूणाचे नाव संकेत संदीप खामकर ( वय वर्ष १९ रा. पाडळी ता. हातकणंगले ) असे असून त्याचे पेठवडगाव येथील एका मुलीशी प्रेमसंबध होते. त्या मुलीच्या नातेवाईकांचा  शिरोलीतील बुधले मंगल कार्यालयात बारश्याचा कार्यक्रम होता.संकेत हा मुलीला भेटण्यासाठी गावातील एका मित्राला सोबत घेवून शुक्रवारी रात्री ८.३० वाजता बुधले मंगल कार्यालयात आला असल्याचे मुलीच्या नातेवाईकांना समजल्यावर संकेत व नातेवाईक यांच्यात वाद झाला. या वादातून नातेवाईकांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यास ठार मारले. ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली होती.या तरुणावर हल्ला होत होता .त्यावेळी त्यांना रोखण्यासाठी कोणीच पुढे आले नाही. त्याच्या सोबत आलेल्या मित्रास मुलीच्या नातेवाईकांनी ठार मारण्याची धमकी दिली व त्याचा मोबाईल ही काढून घेतला. घाबरलेल्या अवस्थेत संकेतच्या मित्राने तेथून पळ काढला. त्याने शिरोली फाटा येथे येवून अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून गावात फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली .

संकेतचे नातेवाईक घटनास्थळी येईपर्यंत संकेत जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या मदतीस कोणीच आले नव्हते. संकेतला वेळेवर उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असते तर त्याचा जीव वाचला असता .

संकेतचे आर्मीत जाण्याचे स्वप्न होते. तो लेखी , शारिरीक व मैदानी परिक्षेत पास झाला होता. फक्त वैद्यकीय तसासणी राहिली होती.

संकेत पाच वर्षांचा होता त्यावेळी त्याच्या वडीलांचे निधन झाले आहे. त्यानंतर संकेतची आई ही संकेतला सोडून तीच्या माहेरी निघून गेली आहे. त्यानंतर आजपर्यंत संकेतचा सांभाळ त्याच्या आजी व चुलत्यानी केला होता. संकेतच्या खुनाच्या बातमीने पाडळी गावात खळबळ उडाली आहे. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील आरोपी हा एका प्रकरणात सजा भोगत आहे. तो नुकताच पॅरोलवर बाहेर आला असे समजते. सपोनि पंकज गिरी तपास करीत आहेत. त्याच्या पश्चात वयस्कर आजी आजोबा व लहान बहिण असा परिवार आहे.
 

Web Title: A young man was brutally murdered in Shiroli over a love affair, an incident at midnight on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.