खुनाच्या घटनांनी कोल्हापूर हादरलं; इचलकरंजीत डोक्यात दगड घालून युवकाचा खून 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 12:40 PM2024-07-04T12:40:14+5:302024-07-04T12:41:53+5:30

कोल्हापुरात दोन दिवसापुर्वीच पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून

A youth was killed by throwing a stone on his head at Ichalkaranji in Kolhapur | खुनाच्या घटनांनी कोल्हापूर हादरलं; इचलकरंजीत डोक्यात दगड घालून युवकाचा खून 

खुनाच्या घटनांनी कोल्हापूर हादरलं; इचलकरंजीत डोक्यात दगड घालून युवकाचा खून 

इचलकरंजी : शहापूर येथील शाळेच्या पाठीमागे एका अल्पवयीन युवकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. सुशांत कांबळे (रा आसरानगर, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेली ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. शहापूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह विच्छेदनासाठी आयजीएम रुग्णालयात हलवण्यात आला आहे.    
   
हा खून तीन ते चार जणांनी केला असल्याची शक्यता असून त्यातील काही संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने ताब्यात घेतल्याचे समजते. शर्यतीच्या कारणावरून पूर्वी झालेला वाद नशा केल्यानंतर उफाळून आला आणि त्यातून हा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. घटनास्थळी व आयजीएम रुग्णालय परिसरात गर्दी झाली होती. सुशांत हा एका मित्राच्या वाढदिवसासाठी जातो म्हणून सांगून काल सायंकाळी घरातून बाहेर पडला होता.

कोल्हापुरात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून

कोल्हापुरात दोन दिवासापुर्वीच राजारामपुरी येथील १५ व्या गल्लीत पूर्ववैमनस्यातून पंकज निवास भोसले याचा दगडाने ठेचून चौघांनी निर्घृण खून केला होता. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी गणेश विक्रम काटे, नीलेश विक्रम काटे, उमेश विक्रम काटे अमित उल्हास गायकवाड यांना अटक केली आहे.

Web Title: A youth was killed by throwing a stone on his head at Ichalkaranji in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.