जिल्ह्याची वाटचाल एड्समुक्तीकड
By Admin | Published: February 15, 2015 11:58 PM2015-02-15T23:58:07+5:302015-02-16T00:01:38+5:30
प्रबोधनामुळे शक्य : आढावा बैठकीत उपजिल्हाधिकाऱ्यांची माहितीे
कोल्हापूर : प्रबोधनात्मक कार्यक्रम केल्यामुळे नागरिकांमध्ये एचआयव्ही तपासणी करून घेण्याचे प्रमाण वाढले व एड्सच्या प्रमाणामध्ये घट झाल्याची माहिती जिल्हा एड्स नियंत्रण समितीच्या बैठकीत दिली. निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केले.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. एस. आडकेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास देशमुख, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर, वारांगना सखी संघटनेच्या शारदा यादव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.वारांगनांसाठी समाज कल्याणकारी योजना पोहोचवण्यासाठी शिबिरांचे आयोजन करावे, अशा सूचना उपजिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिल्या. महिला व बालकल्याण विभागांतर्गत आधारगृहातील महिला व बालकांचे आधार कार्ड काढणे, शिरोली नाक्याजवळ ट्रक चालकांसाठी एचआयव्ही प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जागा उपलब्ध करून देणे यावर चर्चा झाली. डॉ. हर्षला वेदक यांनी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम तसेच एचआयव्ही-टी.बी. रुग्णांची माहिती दिली. कर्नाटक हेल्थ प्रमोशन ट्रस्ट अंतर्गत काबा प्रकल्पाची जिल्हा समन्वयक संदीप कदम यांनी माहिती दिली. निरंजन देशपांडे यांनी प्रास्ताविक केले.
जिल्ह्यात १९६ ठिकाणी सुविधा
एड्स रुग्णांसाठी जिल्ह्यात आय.टी.सी.टी., ए. आर. टी. सेंटर, ब्लड बँक अशा विविध १९६ ठिकाणी वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येत आहे. तपासणी, गर्भवती माता व बाळाला होणारे एड्सचे प्रमाण, वारांगना सखी संघटना, युवा विकास संस्था, मोटार मालक संघटना, लोटस मेडिकल फाउंडेशन यांच्याकडे नोंदणी याची दीपा शिपूरकर यांनी माहिती दिली.