आडूर ग्रामपंचायत कार्यालय मोडकळीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:25 AM2021-04-01T04:25:11+5:302021-04-01T04:25:11+5:30

आडूर गावची ग्रामपंचायत आडूर, कळंबे व भामटे अशी ग्रुप ग्रामपंचायत होती. यानंतर लोकसंख्या वाढीबरोबर स्वतंत्र ग्रामपंचायतीचे निकष पूर्ण केल्यानंतर ...

Aadur Gram Panchayat Office Modkalis | आडूर ग्रामपंचायत कार्यालय मोडकळीस

आडूर ग्रामपंचायत कार्यालय मोडकळीस

Next

आडूर गावची ग्रामपंचायत आडूर, कळंबे व भामटे अशी ग्रुप ग्रामपंचायत होती. यानंतर लोकसंख्या वाढीबरोबर स्वतंत्र ग्रामपंचायतीचे निकष पूर्ण केल्यानंतर १९७० ला प्रथम भामटे व त्यानंतर कळंबे तर्फे कळे या गावच्या स्वतंत्र ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या. आडूर गावची ग्रामपंचायत पूर्वी ज्या तलाठी कार्यालयात भरत होती येथेच आजही आहे. ही इमारत आता मोडकळीस आली आहे आणि कोणत्याही वेळी कोसळण्याच्या परिस्थितीत आहे.

शासनाने ग्रामपंचायतीकडे दरवर्षी थेट वित्त आयोगाचा निधी दिला जातो. त्याशिवाय गावचा कारभार ऑनलाइन करण्यासाठी यंत्रणाही पुरवली आहे. अशा वेळी ग्रामपंचायतीला गेल्या ५० वर्षांत स्वतंत्र इमारत उभा करता आलेली नाही. करवीर तालुक्यातील अनेक गावांत लोकवर्गणी, शासकीय व राजकीय निधी आणून टोलेजंग व कॉर्पोरेट ग्रामपंचायत इमारती बांधण्यात आल्या आहेत; पण आडूर गावातील गावकारभाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले असते, तर मोडक्या कार्यालयात बसून कारभार करण्याची वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

चौकट

ग्रामपंचायत कार्यालयाला जागा मिळेना.

Web Title: Aadur Gram Panchayat Office Modkalis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.