आजरा साखर कारखाना पदाधिकारी बदलाच्या हालचाली

By admin | Published: August 6, 2015 09:46 PM2015-08-06T21:46:32+5:302015-08-06T21:46:32+5:30

अशोक चराटी अध्यक्षपदाचे दावेदार : अध्यक्ष केसरकर यांच्यासह उपाध्यक्ष घोरपडे राजीनामा देणार

Aajara Sugar Factory Officer Replacement Movement | आजरा साखर कारखाना पदाधिकारी बदलाच्या हालचाली

आजरा साखर कारखाना पदाधिकारी बदलाच्या हालचाली

Next

ज्योतीप्रसाद सावंत - आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्याकडून आमदार हसन मुश्रीफ यांनी राजीनामा मागितला असून, आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नूतन पदाधिकारी निवड प्रक्रिया पार पडण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. अध्यक्षपदासाठी श्रीमती अंजना रेडेकर यांचा दावा राहणार असून, संख्याबळाच्या जोरावर अण्णा-भाऊ संस्था समूहाचे अशोक चराटी हेदेखील अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार समजले जातात.
आजरा तालुका संघ निवडणुकीपाठोपाठ आजरा साखर कारखान्याच्या पदाधिकारी निवडीच्या हालचाली सुरू आहेत. गेल्या चार महिन्यांत आजरा तालुक्यातील राजकीय वातावरण बरेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर कारखाना पदाधिकारी निवड प्रक्रियेला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांवर मे महिन्यात होणाऱ्या कारखाना निवडणुकीची जबाबदारी राहणार आहे. कारखान्याची सद्य:स्थिती व आर्थिक आव्हाने पाहता अंजनाताई रेडेकर अथवा अशोक चराटी यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवावी, अशी मागणी बहुतांशी संचालक करीत आहेत.
मुश्रीफ व अशोक चराटी यांच्यातील ताणलेले संबंध पाहता मुश्रीफ, के.पी. पाटील हे सहजासहजी चराटी अथवा त्यांच्या समर्थक संचालकांवर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवतील असे वाटत नाही. प्रसंगी आपल्या समर्थक संचालकांच्या बळावर चराटी बहुमताद्वारे अध्यक्षपदी विराजमान होणे फारसे अवघड वाटत नाही. अंजनातार्इंना अद्याप अध्यक्षपदाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे पूर्वनियोजनानुसार त्यांनाही संधी देण्याची गरज आहे. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष विष्णुपंत केसरकर यांचा राजीनामा घेणे कदाचित मुश्रीफ यांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरू शकते. राष्ट्रवादीची सत्ता अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा धोका राष्ट्रवादी व आजरा तालुक्यातील राष्ट्रवादीचे सध्याचे कार्यकर्ते कितपत पत्करणार हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. तसेच संख्याबळाचा प्रश्न उपस्थित झालाच, तर तालुका संघ निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर आमदार मुश्रीफ यांच्या विरोधी गटातील संचालकांची नेमकी भूमिका (?) काय राहील, यावरही बरीच समीकरणे अवलंबून आहेत.


आजरेकर पुन्हा अनुभवणार सत्तासंघर्ष
पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँगे्रस विरुद्ध इतर सर्वजण असा सत्तासंघर्ष आजरा तालुकावासीयांना अनुभवण्यास मिळण्याची चिन्हे आहेत. अशोकअण्णा, अंजनाताई यांना अगदी सहजपणे अध्यक्षपद मिळणार नाही, हे निश्चित.

राजीनामा देणार :
केसरकर
अध्यक्षपदाचा राजीनामा आपल्याकडे मुश्रीफ यांनी मागितला असून, या पदाचा रीतसर राजीनामा आपण देणार आहे, अशी प्रतिक्रिया विद्यमान अध्यक्ष विष्णुपंत केसरकर यांनी दिली.

Web Title: Aajara Sugar Factory Officer Replacement Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.