आम आदमी पार्टीतर्फे ओढ्यात उतरून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 01:48 PM2021-06-09T13:48:44+5:302021-06-09T14:10:48+5:30

Aap Andolan Kolhapur : कोल्हापूर येथील आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सम्राटनगरातील ओढ्यात उतरून अतिक्रमणाकडे लक्ष वेधले. ओढयाची मोजणी करा, ओढ्यातील बिल्डरने केलेले अतिक्रमण हटवा, सम्राटनगरातील जनतेला न्याय द्या, अशा घोषणा देत पदाधिकाऱ्यांनी ओढ्यात उतरून घोषणाबाजी केली.

Aam Aadmi Party's agitation in the stream | आम आदमी पार्टीतर्फे ओढ्यात उतरून आंदोलन

सम्राटनगरातील ओढ्यात उतरून आपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

Next
ठळक मुद्देआम आदमी पार्टीतर्फे ओढ्यात उतरून आंदोलन सम्राटनगरातील अतिक्रमणाकडे वेधले लक्ष

कोल्हापूर : येथील आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सम्राटनगरातील ओढ्यात उतरून अतिक्रमणाकडे लक्ष वेधले. ओढयाची मोजणी करा, ओढ्यातील बिल्डरने केलेले अतिक्रमण हटवा, सम्राटनगरातील जनतेला न्याय द्या, अशा घोषणा देत पदाधिकाऱ्यांनी ओढ्यात उतरून घोषणाबाजी केली.

सम्राटनगरातील ओढयात एका बिल्डरने बेकायदेशीरपणे बांधकाम केले आहे. ओढयाचे पात्र कमी झाल्याने पावसाळ्यात पात्रातील पाणी परिसरातील घरात घुसत आहे. म्हणून ओढ्यातील अतिक्रमण काढावे, अशी मागणी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्याकडे केली होती. त्यानंतर देसाई यांनी पाहणी करून ओढ्याची मोजणी करण्याचे आदेश टाऊन प्लॅनिंगच्या प्रशासनास दिले होते. पण अतिक्रमण काढण्याकडे दूर्लक्ष केले.

यामुळे आपच्या पदाधिकाऱ्यांनी थेट ओढ्यात उतरून आंदोलन केले. आंदोलनाच्या ठिकाणी उपशहर नगररचनकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता बाबुराव दबडे यांनी भेट दिली. त्यांनी अतिक्रमण काढण्यासंबंधी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

 

Web Title: Aam Aadmi Party's agitation in the stream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.