‘आप’ची महापालिकेसमोर मुकनिदर्शने
By admin | Published: June 20, 2017 06:31 PM2017-06-20T18:31:11+5:302017-06-20T18:31:11+5:30
रस्ते हस्तांतर प्रस्तावाला विरोध : तोंडावर काळ्या पट्या बांधून निषेध
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २0 : रस्ते हस्तांतराच्या प्रस्तावाच्या नावाखाली दारु दुकाने पूर्ववत सुरु ठेवण्याचा महानगरपालिकेतील सत्तारुढांचा प्रयत्न सुरु असून त्याला विरोध करण्यासाठी मंगळवारी आम आदमी पार्टीच्यावतीने महासभेवेळी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर तोंडावर काळ्या पट्टी बांधून मुक निदर्शने केली.
उच्च न्यायालयाने जे राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या ५०० मीटर अंतरावरील सर्व दारु दुकाने बंद करण्याचा आदेश दिला आहे. पण असे रस्ते शहरातून गेल्याने नियमातून पळवाटा काढून या रस्त्यांचे तुकडे करुन ते रस्ते हस्तांतर करुन दारु दुकाने सुरु करण्याचा महानगरपालिकेचा डाव आहे. त्याबाबत काही कारभाऱ्यांनी हा विषय महासभेत आणला आहे. त्या विषयाला विरोध करावा यासाठी येथील आम आदमी पार्टीच्यावतीने मंगळवारी सकाळी महासभेच्या पूर्वी महापालिकेच्या मुख्यप्रवेशद्वारासमोर तोंडावर काळ्या पट्या बांधून मुक निदर्शने केली. त्यावेळी या कार्यकर्त्यांनी हातात दारुबंदीचे फलक घेतले होते. त्यांनी डोक्यावर आपची टोपी व तोंडावर काळी पट्टी बांधली होती.
महासभेला येणाऱ्या सर्व माजी नगरसेवकांना या दारुबंदीच्या फलकाद्वार जनजागृती केली जात होती. या मुकआंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष नारायण पोवार यांनी केले. तर यावेळी नाथाजी पोवार, संदीप देसाई, निलेश रेडेकर, विश्वनाथ श्ोट्टी, उत्तम पाटील, अनिरुध्द शेडगे, संजय नावले, कृष्णा काणेकर, रावसाहेब पाटील-सुर्यवंशी, प्रमोद परीट, संदीप पाटील आदी सहभागी झाले होते.