आरती पाटीलची ऑलिम्पिक कॉलिफॉय स्पर्धेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:22 AM2021-03-28T04:22:59+5:302021-03-28T04:22:59+5:30
उचगाव : येथील बॅडमिंटनपटू आरती जानोबा पाटील (वय २४) ही जन्मापासून डाव्या हाताने दिव्यांग असल्यामुळे तिला खेळासाठी ...
उचगाव : येथील बॅडमिंटनपटू आरती जानोबा पाटील (वय २४) ही जन्मापासून डाव्या हाताने दिव्यांग असल्यामुळे तिला खेळासाठी उजव्या हातावर अवलंबून राहावे लागते. परंतु, जन्मजात अपंगावर मात करीत २९ मार्च २०२१ ते ४ एप्रिल २१ रोजी दुबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ती सहभागी होणार आहे.
पॅराबॅडमिंटन जागतिक फेडरेशनच्या महिला एकेरी क्रमवारीत आरती १४ व्या स्थानावर आहे. सध्या ती ठाणे (मुंबई) महानगरपालिकेच्या सय्यद मोढी बॅडमिंटन अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. आतापर्यंत आरतीने राज्यस्तरीय दोन सुवर्णपदके आणि राष्ट्रीय स्तरावर १२ स्पर्धांमध्ये १० सुवर्ण, चार रौप्य, आणि आठ कांस्यपदके जिंकली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने तीन पदके पटकाविली आहेत. २०१७ मधील एशियन युथ पॅराबॅडमिंटन, २०१८ मधील व्हिक्टर डेन्मार्क पॅराबॅडमिंटन, २०१९ मधील युगांडा पॅराबॅडमिंटन इंटरनॅशनल स्पर्धेतील पदकांचा यात समावेश आहे. तसेच २०१९ मधील टोटल बिडबल्यूएफ पॅराबॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि जपान पॅराबॅडमिंटन इंटरनॅशनल २०१९ मध्येदेखील ती सहभागी झाली होती.
आतापर्यंत तिला सुनील देवांग सोलापूरचे प्रशिक्षक, फिजिओ संदीप भागवत सर, तसेच शाहू साखर कारखाना, कागल यांचे मार्गदर्शन मिळत आले.
फोटो २७ आरती जानोबा पाटील