देशात ‘अब की बार, सिर्फ रोजगार’ ही चळवळ उभारली पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:27 AM2021-08-23T04:27:52+5:302021-08-23T04:27:52+5:30

येथील श्रमिक प्रतिष्ठानच्या कॉम्रेड अवी पानसरे व्याख्यानमाला-२०१९ मधील व्याख्यानांच्या ‘भारतावरील आर्थिक संकट’ या डॉ. मेघा पानसरे संपादित पुस्तकाचे ...

A 'Ab Ki Bar, Sirf Rozgar' movement should be set up in the country | देशात ‘अब की बार, सिर्फ रोजगार’ ही चळवळ उभारली पाहिजे

देशात ‘अब की बार, सिर्फ रोजगार’ ही चळवळ उभारली पाहिजे

googlenewsNext

येथील श्रमिक प्रतिष्ठानच्या कॉम्रेड अवी पानसरे व्याख्यानमाला-२०१९ मधील व्याख्यानांच्या ‘भारतावरील आर्थिक संकट’ या डॉ. मेघा पानसरे संपादित पुस्तकाचे प्रकाशन ऑनलाईन पद्धतीने झाले. यावेळी अर्थतज्ज्ञ अभ्यंकर यांचे ‘बेरोजगारी - भारतापुढील मोठे संकट’ या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. जे. एफ. पाटील होते. देशात मनुष्यबळ, तंत्रज्ञान, नैसर्गिक साधन स्रोत आहेत; परंतु अल्पशिक्षित, शिक्षित व उच्च शिक्षित अशा सर्वस्तरातील तरुण बेरोजगार आहेत. त्यांच्या सर्व क्षमता वाया जात आहेत. शिक्षण व्यवस्था, विकास, रोजगार यातील सांधा निखळलेला आहे. त्यामुळे देशातील विकासाचे सर्व प्रकल्प कोसळतात. सर्व सरकारी गुंतवणूक वाया जात आहे. अशा परिस्थितीत लोकांच्या हातातील खरेदी शक्ती वाढवणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना जास्त हमीभाव देणे, कंत्राटीकरण व कामगारविरोधी कायदे रद्द करणे आणि सर्व क्षेत्रातील शिक्षित-अशिक्षित लोकांसाठी, विशेषत: तरुणांसाठी ‘रोजगार हमी योजना’ राबविण्याचा उपाय अत्यावश्यक असल्याचे अर्थतज्ज्ञ अभ्यंकर यांनी सांगितले. यावेळी समाज विज्ञान अकादमी या संस्थेचे दत्ता देसाई , ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. श्रीनिवास खांदेवाले, लेखक प्रा. मारोती तेगमपुरे, डॉ. करमसिंग राजपूत, मुक्ता मनोहर, पुणे कलेक्टिवचे साहिल कल्लोळी उपस्थित होते. डॉ. मेघा पानसरे यांनी प्रास्ताविक केले. श्रमिक प्रतिष्ठानचे विश्वस्त सदस्य एस. बी. पाटील यांनी आभार मानले. रसिया पडळकर यांनी सूत्रसंचालन केले.

चौकट

गरिबी, भाववाढीवर मात करता येते

आज राज्यव्यवस्था चालवण्यासाठी शासन हे विचारांच्या भांडवलापेक्षा पैशाच्या भांडवलाला महत्त्व देत आहे. बेरोजगारीच्या प्रश्नाची सोडवणूक केल्यास देशातील गरिबी, भाववाढ, विषमता या सर्व प्रश्नांवर मात करता येते, असे डॉ. जे. एफ. पाटील यांनी सांगितले.

फोटो (२२०८२०२१-कोल-अभ्यंकर व्याख्यान) : कोल्हापुरातील श्रमिक प्रतिष्ठानतर्फे रविवारी ज्येष्ठ मार्क्सवादी विचारवंत अजित अभ्यंकर यांचे ऑनलाईन व्याख्यान झाले. यावेळी डॉ. मेघा पानसरे, रसिया पडळकर, मारोती तेगमपुरे, जे. एफ. पाटील, श्रीनिवास खांदेवाले उपस्थित होते.

Web Title: A 'Ab Ki Bar, Sirf Rozgar' movement should be set up in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.