क्रिस्टल शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत अपहार, कार्यकारी संचालकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 03:15 PM2020-02-11T15:15:26+5:302020-02-11T15:18:52+5:30
शिवाजी उद्यमनगर येथील क्रिस्टल शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मिळालेला फायदा स्वत: वापरून मालमत्ता खरेदी केली. त्यासाठी घेतलेले कंपनीचे कर्ज संचालक मंडळावर ठेवून ९५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीचे कार्यकारी संचालक रणजित शिवाजीराव शेळके (वय ४८ रा. रुईकर कॉलनी ) यांच्यावर राजारामपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
कोल्हापूर : शिवाजी उद्यमनगर येथील क्रिस्टल शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मिळालेला फायदा स्वत: वापरून मालमत्ता खरेदी केली. त्यासाठी घेतलेले कंपनीचे कर्ज संचालक मंडळावर ठेवून ९५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीचे कार्यकारी संचालक रणजित शिवाजीराव शेळके (वय ४८ रा. रुईकर कॉलनी ) यांच्यावर राजारामपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी कंपनीचे संचालक आप्पासाहेब आण्णा शिर्के (६० रा. नारायण पार्क अपार्टमेंट, रुक्मिणीनगर) यांनी फिर्याद दाखल केली. फसवणूकीचा प्रकार २००३ ते २४ सप्टेंबर २००७ या कालावधीत घडला आहे.
कंपनीसाठी लागणारी कामगारांची देणी, व्यवसाय कर, फॅक्टरीसाठी लागणारे सर्व कर, सरकारी निमसरकारी कार्यालयातील परवान्याचा टॅक्स, व्यापाऱ्यांची देणी देण्याचे जबाबदारी संशयित शेळके यांनी घेतली. मात्र वेळेत कर्ज भागविले नसल्याने यूको बँकेने शेळके यांचे राहते घर लिलावात काढले. त्यांच्या नावे असलेली ५ लाख ४५ हजार रुपये बँकेकडे जमा करुन घेतले. मात्र कंपनीच्या नावावर असलेले उर्वरित कर्ज फेडले नसून संचालकांची फसवणूक झाली असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.