‘आभाळमाया’ने फुलविले ऊसतोड मजुरांच्या मुलांचे चेहरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:11 AM2021-02-05T07:11:10+5:302021-02-05T07:11:10+5:30

कोल्हापूर : येथील आभाळमाया या सामाजिक संस्थेने बीड (ता. करवीर) येथील ऊसतोड कामगारांच्या मुलांना स्वेटर, ब्लँकेट आणि शैक्षणिक ...

‘Abhalmaya’ made the faces of the children of the sugarcane workers bloom | ‘आभाळमाया’ने फुलविले ऊसतोड मजुरांच्या मुलांचे चेहरे

‘आभाळमाया’ने फुलविले ऊसतोड मजुरांच्या मुलांचे चेहरे

Next

कोल्हापूर : येथील आभाळमाया या सामाजिक संस्थेने बीड (ता. करवीर) येथील ऊसतोड कामगारांच्या मुलांना स्वेटर, ब्लँकेट आणि शैक्षणिक साहित्य देत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला.

या ऊसतोड कामगारांच्या मुलांना कडाक्याच्या थंडीत माळावरच्या झोपड्यांमध्ये कुडकुडत रात्र काढावी लागते. ते लक्षात घेऊन ‘आभाळमाया’ने हा उपक्रम राबविला. प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, उपशिक्षणाधिकारी जयश्री जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी भारती कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे साहित्य प्रदान करण्यात आले. ‘आभाळमाया’च्या संस्थापिका लक्ष्मी पाटील या संस्थेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांद्वारे समाजभान जपत आदर्शवत कार्य करीत असल्याचे आशा उबाळे यांनी सांगितले. समाजातील दानशूर व्यक्तींनी अशा मुलांना मदत करण्याची गरज असल्याचे लक्ष्मी पाटील यांनी सांगितले. नांदगाव शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल मार्गदर्शिका वर्षा सनगर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी बेबीनंदा मधाळे, रेखा पाटील, माधवी पाटील, शांता वाकुडे, सविता पोतदार, राजू पाटील, शिवाजी बोंगार्डे , प्रकाश चौगुले, शरीफा मणेर, आकांक्षा मोकाशी, अश्विनी संकपाळ, बाळासो कांबळे, मिलिंद कांबळे उपस्थित होते. तुषार पाटील यांनी आभार मानले.

फोटो (३१०१२०२१-कोल-आभाळमाया संस्था) : बीड (ता. करवीर) येथील ऊसतोड मजुरांच्या मुलांना आभाळमाया या सामाजिक संस्थेच्यावतीने आशा उबाळे यांच्या हस्ते स्वेटर, ब्लँकेट, शैक्षणिक साहित्य प्रदान केले. यावेळी शेजारी लक्ष्मी पाटील, जयश्री जाधव, भारती पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: ‘Abhalmaya’ made the faces of the children of the sugarcane workers bloom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.