अभिनव देशमुख कोल्हापूरचे, पंकज देशमुख सातारचे नवे पोलीस अधीक्षक, संदीप पाटील यांची पुण्याला बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 01:27 AM2018-07-28T01:27:13+5:302018-07-28T01:32:52+5:30
राज्य शासनाने शुक्रवारी राज्यातील १२० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांची पदोन्नतीवर नाशिकच्या पोलीस अकादमीच्या उपसंचालकपदी बदली झाली आहे. तर गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. तर उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची सातारच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे.
कोल्हापूर/मुंबई : राज्य शासनाने शुक्रवारी राज्यातील १२० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांची पदोन्नतीवर नाशिकच्या पोलीस अकादमीच्या उपसंचालकपदी बदली झाली आहे. तर गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. तर उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची सातारच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. याबाबत राज्याच्या गृहविभागाने शुक्रवारी रात्री परिपत्रक काढले आहे. बदली झालेले अधिकारी व ठिकाण- के. जी. पाटील (अप्पर पोलीस आयुक्त, ठाणे शहर), डी. वाय. मंडलिक (पोलीस उपमहानिरीक्षक गुन्हा अन्वेषण विभाग पुणे), रविंद्र शिसवे (अप्पर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, मुंबई), निशिथ मिश्रा (अप्पर पोलीस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा मुंबई शहर), मकरंद रानडे (अप्पर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड), एस. जयकुमार (अप्पर पोलीस आयुक्त, सशस्त्र पोलीस दल), संदीप कर्णिक (अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे मुंबई), बी. जी. गायकर (अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे, नागपूर शहर), एस. बी. फुलारी (अप्पर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग पुणे शहर), एस. व्ही. कोल्हे (अप्पर पोलीस आयुक्त विशेष शाखा, बृहन्मुंबई), डी. आर. कराळे (पोलीस उपमहानिरीक्षक - प्रतीक्षेत), प्रवीण पवार (अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे ठाणे शहर), ए. बी. रोकडे (पोलीस उपमहानिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई), बी. जी. शेखर (पोलीस उपमहानिरीक्षक राज्य राखीव, पोलीस दल मुंबई), संजय बावीस्कर (पोलीस आयुक्त अमरावती शहर), विरेश प्रभू (अप्पर पोलीस आयुक्त वाहतूक, मुंबई शहर).
डॉ. सुरेशकुमार मेकला (सहपोलीस आयुक्त नवी मुंबई), एफ. के. पाटील (विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड), पी. पी. मुत्याल (विशेष पोलीस महानिरीक्षक औरंगाबाद), मिलींद भारंबे (विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था मुंबई), रविंद्र कदम (सहपोलीस आयुक्त नागपूर शहर), एस. टी. बोडके (सहपोलीस आयुक्त पुणे शहर).
संदीप पाटील यांची पुण्याला बदली
सातारचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक पदी नेमणूक झाली. सातारच्या पोलीस अधीक्षकपदी पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.