Gokul Milk Election : आबिटकरांचं ठरलं, गोकुळला विरोधी आघाडीसोबतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 11:38 AM2021-04-02T11:38:33+5:302021-04-02T11:41:01+5:30

Gokul Milk Election kolhapur: शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत विरोधी राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय शुक्रवारी सकाळी गारगोटी येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केला.

: Abitkar's decision, Gokul with the opposition | Gokul Milk Election : आबिटकरांचं ठरलं, गोकुळला विरोधी आघाडीसोबतच

Gokul Milk Election : आबिटकरांचं ठरलं, गोकुळला विरोधी आघाडीसोबतच

Next
ठळक मुद्दे आबिटकरांचं ठरलं, गोकुळला विरोधी आघाडीसोबतचलोकमतने दोन दिवसांपूर्वीच दिले होते वृत्त

कोल्हापूर : शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत विरोधी राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय शुक्रवारी सकाळी गारगोटी येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केला.

विरोधी आघाडीत त्यांना किती जागा मिळणार हे स्पष्ट झालेले नाही. परंतू तरीही त्यांनी नंदकुमार ढेंगे, अभिजित तायशेटे यांच्यासाठी आग्रह धरल्याचे सांगण्यात येते. त्यांना गोकुळमध्ये एक जागा देवून जिल्हा परिषदेत आबिटकर गटाच्या वंदना जाधव यांना सत्तेत संधी द्यावी असाही प्रस्ताव आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत आमदार आबिटकर यांनी पाठिंब्याचा निर्णय जाहीर केला. लोकमतने दोन दिवसांपूर्वीच आबिटकर हे विरोधी आघाडीसोबतच राहतील असे वृत्त दिले होते.

आबिटकर गटाला दोन्ही आघाड्यांकडून पायघड्या घालण्यात आल्या होत्या. या गटाला मानणारा राधानगरी व भुदरगड तालुक्यात ठरावधारक वर्ग आहे. त्यांच्याकडे सुमारे दीडशे ठराव असल्याचा दावा केला जातो. त्यामुळेही या गटाच्या भूमिकेला महत्त्व आले. गेल्या निवडणूकीत हा गट विरोधी आघाडीसोबतच होता. परंतू विधानसभेला काँग्रेसचे आमदार व गोकुळच्या सत्तारुढ आघाडीचे नेते पी.एन.पाटील यांची मदत झाल्याने आबिटकर यांच्यापुढे खासदार संजय मंडलिक की आमदार पी. एन. पाटील यांपैकी कुणासोबत जायचे, असे धर्मसंकट उभे राहिले होते.

आबिटकर यांनी पहिली निवडणूक मंडलिक ब्रँडवर लढविली. त्यामुळे मंडलिक गटाशी त्यांची जवळीक जास्त आहे. त्यातही ते शिवसेनेचे आमदार आहेत. विरोधी आघाडी दोन्ही काँग्रेससह शिवसेनाही सहभागी आहे. पक्षीय बंधन, मंडलिक यांच्यासोबतची बांधिलकी, पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबतची जवळीक याचा विचार करून त्यांनी विरोधी आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला.

Web Title: : Abitkar's decision, Gokul with the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.