कलचाचणी १ लाख परीक्षार्थी देणार

By admin | Published: January 25, 2017 12:37 AM2017-01-25T00:37:19+5:302017-01-25T00:37:19+5:30

कृषी, सैन्यदल विषय : ९ फेब्रुवारी ते ४ मार्चपर्यंत कालावधी

About 1 lakh candidates will be present in the discussion | कलचाचणी १ लाख परीक्षार्थी देणार

कलचाचणी १ लाख परीक्षार्थी देणार

Next

कोल्हापूर : दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची करिअर करण्याबाबतची आवड, कल जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागातर्फे मानसशास्त्रीय कलचाचणी दि. ९ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत घेण्यात येईल. यावर्षी चाचणीच्या विषयामध्ये कृषी आणि सैन्यदल या क्षेत्रांसह २२० प्रश्नांचा समावेश केला आहे.
कलचाचणीमध्ये गेल्यावर्षी कला-मानव्यविद्या, वाणिज्य, आरोग्य, तांत्रिक, ललित कला या पाच विषयांतील १५२ प्रश्न होते. यावर्षी चाचणीसाठी कृषी, सैन्यदल विषयांसह २२० प्रश्न असणार आहेत. त्यांची उत्तरे सोडविण्यासाठी दोन तासांचा कालावधी असणार आहे. कोल्हापूर विभागातून यंदा दहावीच्या परीक्षेसाठी १ लाख ५१ हजार ५९६ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नोंदणी केली आहे. त्यातील सुमारे १ लाख विद्यार्थी-विद्यार्थिनी कल चाचणी देतील. आॅनलाईन पद्धतीने होणाऱ्या चाचणीसाठी विद्यार्थ्यांना चार पर्याय असतील. यामध्ये ‘आवडते’, ‘खूप आवडते’, ‘खूप खूप आवडते’ आणि ‘आवडत नाही’ असे पर्याय असणार आहेत. त्यापैकी एकाची निवड परीक्षार्थींना करावी लागणार आहे. दहावीच्या केवळ नियमित विद्यार्थी-विद्यार्थिनींची कलचाचणी घेण्यात येणार आहे. पुनर्परीक्षार्थी आणि १७ क्रमांकाचा अर्ज भरून परीक्षा देणाऱ्यांचा समावेश असणार नाही.


तयारी सुरू; काही ठिकाणी आॅफलाईन परीक्षा
चाचणी आॅनलाईन पद्धतीने होईल. इंटरनेटची सुविधा नसलेल्या अपवादात्मक ठिकाणीच केवळ आॅफलाईन परीक्षा घेण्यात येईल, असे शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी यांनी सांगितले. ते म्हणाले, चाचणीच्या नियोजनासाठी यावर्षी जिल्हानिहाय समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याद्वारे शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षकांना चाचणीची माहिती देण्यात येणार आहे. त्यासाठी ८ फेब्रुवारीपर्यंत शाळानिहाय बैठका घेण्यात येतील. सायबर कॅफे, इंटरनेट सुविधा पुरविणाऱ्या खासगी संस्थांतून चाचणी देता येणार नाही.

Web Title: About 1 lakh candidates will be present in the discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.