सुमारे १४ हजार परीक्षार्थी देणार प्रवेश परीक्षा

By admin | Published: May 3, 2017 04:28 PM2017-05-03T16:28:32+5:302017-05-03T16:28:32+5:30

शिवाजी विद्यापीठाची तयारी पूर्ण; शुक्रवारपासून प्रारंभ

About 14 thousand candidates will be given entrance examination | सुमारे १४ हजार परीक्षार्थी देणार प्रवेश परीक्षा

सुमारे १४ हजार परीक्षार्थी देणार प्रवेश परीक्षा

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. 03 : शिवाजी विद्यापीठ यावर्षी विविध १५० पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या ३९ प्रवेश परीक्षा शुक्रवार (दि. ५) ते मंगळवार (दि. ९) दरम्यान घेणार आहे. आॅनलाईन आणि आॅफलाईन या स्वरुपातील परीक्षांसाठी सुमारे १४ हजार परीक्षार्थींनी नोंदणी केली आहे. सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चिती करण्यासाठी या प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.

या परीक्षांची सुरुवात शुक्रवारी (दि.५ मे) आॅफलाईन पद्धतीने होणार आहे. यात एम.ए. अथवा एम. एस्सी. भूगोल, मास कम्युनिकेशन, एम.एस्सी. केमिस्ट्री, बी. जे. सी, एम. जे. सी, एम. एस्सी. अ‍ॅग्रोकेमिकल्स अँड पेस्ट मॅनेजमेंट, एम. ए. भाषेच्या (विद्याशाखा बदल) अन्य शाखांचा समावेश आहे. शनिवारी (दि. ६ मे ) बी. लिब. सायन्स अँड इन्फर्मेशन सायन्स, एम. लिब सायन्स अँड इन्फर्मेशन सायन्स, एम. एस्सी. मायक्रोबायॉलॉजी, एम. एस्सी. फार्मास्युटिकल मायक्रोबायॉलॉजी, एम. एस्सी. मॅथेमॅटिक्स, एम. एस्सी. भूगर्भशास्त्र, एम. एस्सी. फिजिक्स, दूरशिक्षण केंद्र- एम. बी. ए. (एक्झिक्युटिव्ह) अँड एम. बी. ए., एम. एस्सी स्टॅटिस्टिक्स, एम. एस्सी. अ‍ॅप्लाईड स्टॅटिस्टिक्स अँड इन्फर्मेटिक्स. रविवारी (दि. ७ मे ) एम. एस्सी. शुगर टेक्नॉलॉजी, एम. एस. डब्ल्यू. (रुरल कम्युनिटी डेव्हलपमेंट), एम. एस्सी. अल्कोहोल टेक्नॉलॉजी, एम. आर. एस. (मास्टर आॅफ रुरल स्टडीज), एम. बी. ए. (रुरल मॅनेजमेंट), एम. टेक. (रुरल टेक्नॉलॉजी) परीक्षा होईल.

आॅनलाईन स्वरुपातील परीक्षा सोमवारी (दि. ८) सुरू होतील. यामध्ये एम. एस्सी. बॉटनी, एम. एस्सी. कॉम्प्युटर सायन्सेस, एम. एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. एम. एस्सी. प्राणिशास्त्र, एम. एस्सी. बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, एन्व्हार्न्मेंटल बायोटेक्नॉलॉजी, एम. एस्सी. एन्व्हार्न्मेंटल सायन्स, एम. एस्सी. फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी या अभ्यासकमाच्या परीक्षा मंगळवारी (दि. ९) होणार आहेत. यातील आॅनलाईन परीक्षांसाठी ३२७३, तर आॅफलाईन परीक्षांकरिता १०८१४ इतक्या परीक्षार्थींनी नोंदणी केली आहे.

Web Title: About 14 thousand candidates will be given entrance examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.