शाहूवाडीमधील पाणी योजनेस साडेसात कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:07 AM2017-08-18T00:07:39+5:302017-08-18T00:07:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : शाहूवाडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील रखडलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी सात कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन कृषी, फलोत्पादन, पणन, स्वच्छता व पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. शाहूवाडी तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी आमदार सत्यजित पाटील, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर जि. प. सदस्य विजय बोरगे यांची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी खोत म्हणाले, शासनाने शेतकºयांसाठी विविध योजना आणल्या आहेत. चालू वर्षी उसाची एफआरपी वाढल्यामुळे शेतकºयांना टनाला तीन हजार रुपयांच्या पुढे दर मिळणार आहे. दुधाचा खरेदी दर वाढविला आहे .
आमदार सत्यजित पाटील म्हणाले, शासनाने शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी. तसेच कृषी विभागाला जास्त प्रमाणात निधी देण्याची मागणी केली .
सर्जेराव पाटील म्हणाले, तालुक्याच्या कोरडवाहू गावात छोटे पाझर तलाव करणे गरजेचे आहे. राजकारण विरहित काम केले तर गावांना पाणी मिळेल. परिणामी, कोणत्याही गावाला पाण्यापासून वंचित राहावे लागणार नाही.
तहसीलदार चंद्रशेखर सानप यांनी तालुक्यातील पाच गावांचे आॅनलाईन उतारे मिळण्याची सोय झाल्याचे सांगितले.
यावेळी सागर खोत, सुरेश पाटील, सभापती स्नेहा जाधव, उपसभापती दिलीप पाटील, जि. प. सदस्या आकांक्षा पाटील, हंबीरराव पाटील, नगराध्यक्ष अमोल केसरकर, उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, नियोजन मंडळाचे सदस्य नगरसेवक राजू प्रभावळकर, तहसीलदार चंद्रशेखर सानप, उपविभागीय अधिकारी अजय पवार, उपअभियंता एम. बी. पवार, जे. डी. काटकर, पोलीस निरीक्षक अनिल गाडे, गटविकास अधिकारी डॉ. उदय पाटील, तालुका कृषी अधिकारी बंडा कुंभार उपस्थित होते. चंद्रशेखर सानप यांनी आभार मानले.