बेपत्ता तरुण-तरुणी जातात तरी कोठे..? कोल्हापूर जिल्ह्यातून गेल्या वर्षभरात सुमारे १९८ जण बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 06:15 PM2021-12-23T18:15:04+5:302021-12-23T18:15:49+5:30

बहुतांशी मुली या विवाह करूनच परततात.

About 198 people have gone missing from Kolhapur district in the last one year | बेपत्ता तरुण-तरुणी जातात तरी कोठे..? कोल्हापूर जिल्ह्यातून गेल्या वर्षभरात सुमारे १९८ जण बेपत्ता

बेपत्ता तरुण-तरुणी जातात तरी कोठे..? कोल्हापूर जिल्ह्यातून गेल्या वर्षभरात सुमारे १९८ जण बेपत्ता

googlenewsNext

कोल्हापूर : जिल्ह्यातून गेल्या वर्षभरात सुमारे १९८ जण रफूचक्कर झाल्याची पोलीस दप्तरी नोंद झाली आहे. त्यातील सुमारे १४४ जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रेम प्रकरण असो अगर फूस लावून पळवलेल्या असो, त्याची पोलिसांत नोंद करणे आवश्यकच असते; पण अल्पवयीन मुली रफूचक्कर झाल्यास त्याबाबत ज्या तरुणासोबत गेल्या त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होतो. बहुतांशी मुली या विवाह करूनच परततात.

बहुतांश प्रकरणात मुली या त्यांच्या मर्जीनेच प्रियकरासोबत रफूचक्कर झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलीस दप्तरी नोंद मात्र अपहरणाची होते, त्यामुळे अपहरणाचा आकडा हा मोठा दिसतो. प्रत्यक्षदर्शी वस्तुस्थिती वेगळीच असते. सज्ञान विवाह करून परतल्यानंतर त्यांचे जबाब घेऊन ते प्रकरण निकाली काढण्यासाठी पोलिसांनाच त्या जोडप्यांच्याकडे वारंवार चकरा माराव्या लागतात.

तीन वर्षांत ६१५ बेपत्ता, सापडले ४९८

गेल्या वर्षभरात सुमारे १९८ मुली व मुले बेपत्ता झाल्याच्या नोंदी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत झाल्या आहेत. बहुतांश मुली या आपल्या प्रियकरासोबत गेल्याचे उघड झाले आहे. या बेपत्ता मुला-मुलींपैकी १४४ जण सापडल्याची नोंद दिसून येते, तर २०२० मध्ये १५० जण बेपत्ता झाले, त्यापैकी ११६ जण सापडले. तसेच २०१९ मध्ये तब्बल २६७ बेपत्तापैकी २३८ जण सापडल्याचे पोलीस दप्तरी दिसते.

लग्न न झालेले अन् झालेले देखील

वर्षभरात अनेक मुली या आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्या. अनेक अल्पवयीन असल्याने त्यांना विवाहाच्या अडचणी उद्भवल्याने ती जोडपी काही दिवस बाहेर राहून परतली, तर अनेकजण विवाह करूनच घरी परतत असल्याचे दिसून आले आहे.

शहरात अधिक, ग्रामीणमध्ये कमी

गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी पाहता मुले, मुली पळून जाण्याच्या तक्रारींची नोंद ही शहरातील पोलीस ठाण्यात तुलनेने जादा दिसते, तर त्या प्रमाणात ग्रामीण भागात काही अंशी कमी असल्याचे दिसून येत आहे.

राग किंवा प्रेम...

- मुले व मुली पळून जाण्याची दोनच कारणे सध्या पुढे आली आहेत. घरचे रागावलेत म्हणून एकादा-दुसरा दिवस घरातून पळून जाऊन मित्र अगर मैत्रिणींच्या घरी राहतात.

- तक्रार नोंद झाल्यानंतर ते परत येत असल्याचे दिसते, तर बहुतांशी प्रकरणात प्रेम प्रकरणातून पळून गेल्याचे दिसून येत आहे.

Web Title: About 198 people have gone missing from Kolhapur district in the last one year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.