सुमारे साडेतीन हजार वीजग्राहकांची ‘गो-ग्रीन’ला साथ-कोल्हापूर, सांगलीतील चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 11:43 AM2019-04-03T11:43:20+5:302019-04-03T11:45:14+5:30
आॅनलाईन व पर्यावरण स्नेही पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी महावितरणने दि. १ डिसेंबर २०१८ पासून छापील वीजबिलाऐवजी ‘गो-ग्रीन’ योजनेतून ई-मेलवर वीजबिल स्वीकारणाऱ्या ग्राहकांना महिन्याला १0 रुपये सवलत जाहीर केली आहे. चार महिन्यांत
कोल्हापूर : आॅनलाईन व पर्यावरण स्नेही पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी महावितरणने दि. १ डिसेंबर २०१८ पासून छापील वीजबिलाऐवजी ‘गो-ग्रीन’ योजनेतून ई-मेलवर वीजबिल स्वीकारणाऱ्या ग्राहकांना महिन्याला १0 रुपये सवलत जाहीर केली आहे. चार महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यातील १९७४ आणि सांगलीच्या १४५४ अशा एकूण ३४२८ ग्राहकांनी गो-ग्रीनला प्रतिसाद दिला आहे.
‘गो-ग्रीन’ला नोंद करण्याची सोय महावितरणच्या (६६६.ेंँं्िर२ूङ्मे.्रल्ल) या संकेतस्थळावर भेट द्यावी. ज्या ई-मेलवर ई-बिल हवे आहे. नोंदवून छापील वीजबिलावर असलेला १५ अंकी ‘जीजीएन’ क्रमांक टाकावा. त्यानंतर अटी मान्य करून सबमिट केल्यास ईमेल प्राप्त होतो. ईमेलवर ‘हीअर’ या शब्दावर क्लिक केल्यास नोंदणी पूर्ण होते. नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना पुढील महिन्यापासून छापील बिल बंद होऊन ईमेलवर बिल प्राप्त होते. शिवाय बिलावर प्रतिमहा १0 रुपये सवलत मिळविता येते.
बिल जतन करणे सोपे
महावितरणच्या मोबाईल अॅपवर देखील ‘गो-ग्रीन’ नोंदणी करता येते. छापील बिलापेक्षाही ईमेलवर आलेल्या पीडीएफ स्वरूपातील बिल जतन करणे सोपे आहे. त्यातून पर्यावरण संवर्धनाला हातभार लागणार आहे; त्यामुळे जास्तीत जास्त वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ माध्यमातून १0 रुपयांची सवलत घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.