मुबलक पाणी, तरीही कोरड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:36 AM2019-04-29T00:36:52+5:302019-04-29T00:36:58+5:30
संपूर्ण राज्यात कोल्हापूरची ‘पाणीदार जिल्हा’ अशी ओळख आहे. मात्र, यावर्षी जिल्ह्याचा पारा ४१ अंश डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आहे. सध्या ...
संपूर्ण राज्यात कोल्हापूरची ‘पाणीदार जिल्हा’ अशी ओळख आहे. मात्र, यावर्षी जिल्ह्याचा पारा ४१ अंश डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आहे. सध्या जिल्ह्यात पाणीसाठा पुरेसा असला तरी काही भागांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. डोंगरकपाऱ्यातील वाड्या-वस्त्यांपासून शहराजवळच्या गावांमध्येदेखील नियोजनाअभावी पाणीटंचाई जाणवत आहे. जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता समाधानकारक आहे. मात्र, योग्य नियोजन केल्यास पुढील दोन महिने टंचाईच्या फारशा झळा नागरिकांना बसणार नाहीत.
हातकणंगलेत १३ गावांत पाण्यासाठी वणवण
तालुक्यामधील ६२ पैकी १३ गावांमध्ये पाणीटंचाईच्या तीव्र झळा ग्रामस्थांना सोसाव्या लागत आहेत. या १३ पैकी ११ गावांमध्ये शेतीसाठी असलेल्या सहकारी आणि खासगी नळ पाणीपुरवठा योजना, तसेच शेतकऱ्यांच्या खासगी विहिरी पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहण करण्याचे प्रयत्न तालुका प्रशासनाकडून सुरूआहेत. तर दोन गावांमध्ये तत्काळ विंधन विहिरी घेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे. तीन महिन्यांपूर्वी तालुका पाणीटंचाई संभाव्य आराखडा तालुका प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाला पाठवूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही
झाली नसल्याबद्दल ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे.
तालुक्यातील लहान लोकसंख्या असलेल्या चोकाक, माले, तासगाव, यळगूड, कापूरवाडी, जंगमवाडी, बिरदेववाडी, लक्ष्मीवाडी, अंबपवाडी, कासारवाडी, माणगांववाडी या ११ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीच्या पाणीयोजना कुचकामी ठरत आहेत. ग्रामस्थांना पाण्यासाठी दररोज पायपीट, वणवण करावी लागत आहे.
तालुक्यातील मजले आणि दुर्गेवाडी या दोन गावांमध्ये पाणीटंचाई आरखड्यानुसार तत्काळ विंधन विहिरी खुदाईचा प्रस्ताव तालुका प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. मात्र, विंधन विहिरी खुदाईचा पत्ता नसल्यामुळे या दोन गावांमध्ये ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरूच आहे.
शिरोळ तालुक्यात तमदलगे तहानलेलेच
शिरोळ : बारमाही वाहणाºया पंचगंगा, कृष्णा, वारणा व दूधगंगा या नद्यांमुळे शिरोळ तालुका सुजलाम् सुफलाम् बनला असला तरी तालुक्यातील तमदलगे हे गाव
अद्याप तहानलेलेच आहे. सध्या चार दिवसांतून एकदा गावाला पाणीपुरवठा होत आहे. पाणी नसल्याने येथील शेतपिके वाळू लागली
आहेत. उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने भूजल पातळीदेखील कमी झाली आहे. परिणामी,
काही गावांमध्ये कूपनलिकांना पाणी येणे बंद झाले आहे, तर जयसिंगपुरातील हॉटेल व्यावसायिकांना पाण्याचे टँकर विकत आणावे लागत आहे.
मार्चच्या दुसºया आठवड्यातच नदीपात्रात पाणी कमी झाल्याने पाणीप्रश्न गंभीर बनला होता. चांदोली धरणातून पाण्याचे नियोजन केल्यामुळे सध्यातरी पाणीटंचाई भासत नाही. उन्हाचा पारा वाढत असल्याने भूजल पातळीदेखील खालावली आहे. त्याचा परिणाम कूपनलिकांवर झाला आहे. उंच असणाºया भागातील कूपनलिकांना पाणी येणे बंद झाले आहे. संभाजीपूर येथील नांदणी नाका, केपीटी, वरेकर कॉलनी या परिसरात कूपनलिकांचे पाणी पूर्णत: कमी झाले आहे, तर जयसिंगपूर शहरातील काही हॉटेलधारक टँकरने पाणी विकत आणत आहेत. वाढता उन्हाचा तडाखा भविष्यातील धोक्याची घंटा असून, नद्यांमुळे तालुक्यात मुबलक पाणी असले तरी उन्हाळ्यात नागरिकांनी काटकसरीनेच पाण्याचा वापर करण्याची गरज आहे.
तमदलगे गावात स्थापनेपासूनच पाणीटंचाईची समस्या कायम आहे. सध्या ज्या विहिरीवरून पाणी उपसा केला जातो, त्याची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे चार दिवसांतून एकदा पाणी ग्रामस्थांना मिळत आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून पाझर तलावातील जुन्या विहिरीतील पाणी उपसा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या मोटार व पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, वीज कनेक्शन नसल्यामुळे अडचण ठरत आहे. ही सुविधा सुरू झाल्यास ग्रामस्थांच्या पाण्याची अडचण दूर होणार आहे. दरम्यान, शासनाच्या योजनेतून वारणा नदीवरून पेयजल योजनेचे काम सुरू आहे. पुढील वर्षी तमदलगेकरांना वारणेचे पाणी उपलब्ध होणार असून, गावातील पाणीप्रश्न निकालात निघणार आहे.
कागल पाणीदार... टंचाई मर्यादितच
कागल तालुक्याला दूधगंगा, वेदगंगा आणि चिकोत्रा अशा तीन नद्यांचे वरदान लाभले आहे. काळम्मावाडी धरणामुळे दूधगंगा, वेदगंगा नद्यांत बारमाही पाणी असते. याच बरोबर टोकाच्या राजकीय संघर्षातून आपली लोकप्रियता टिकविण्यासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी गावा-वाड्या-वस्तीवर वेगवेगळ्या मार्गाने पिण्याचे पाणी पोहोचविले आहे. या पार्श्वभूमीवर काही अपवादात्मक वाड्यावस्त्या सोडता तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई कोठेच जाणवत नाही. तरीही कापशी खोºयातील चार गावांत संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्याचा अनुमान प्रशासनाने लावला आहे.
तमनाकवाडापैकी दलित वस्ती, गलगले पैकी वेताळ वस्ती, अर्जुनवाडापैकी माळवाडी आणि बोळावीपैकी हसूर रोड वस्ती येथे पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. तीन नद्या, कागल, मुरगूड शहरालगतचे मोठे तलाव, लहान अकरा तलाव, दोन कालवे, गावागावांत खोदलेल्या इंधन विहिरी यामुळे पाणी सर्वत्र फिरले आहे. मुळात तालुक्याचे सत्तर टक्के कृषी क्षेत्र सिंचनाखाली आल्याने तालुका तसा पाणीदार बनला आहे. मात्र, खूप वर्षांपूर्वी केलेल्या पाणीपुरवठा योजना कुचकामी होणे, तांत्रिक अडचणी, ग्रामपंचायतीची नकारात्मकता यातून उन्हाळ्यात काही गावांना पिण्याचे पाणी अनियमित आणि अपुरे मिळते, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, तालुक्यात शेतीसाठी पाण्याचा वापर अनियंत्रितपणे होत आहे. नद्यांचे पाणी कर्नाटक राज्याबरोबरच तालुक्याबाहेर मोठ्या प्रमाणात नेले जात आहे. याकडे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनीही लक्ष दिले पाहिजे.
आजºयात २१ गावांमध्ये पाणीटंचाईची झळ
आजरा तालुक्यातील २१ गावांतील वाड्या-वस्तीवर यावर्षी पाणीटंचाईची झळ पोहोचली आहे. पाणीटंचाईची तीव्रता भीषण नसली तरी जनावरे व कपडे धुणे यामुळे गावातील वाड्या-वस्त्यांवर प्रामुख्याने पाणीटंचाई जाणवत आहे.
तालुक्यात हिरण्यकेशी व चित्री या नद्यांतून पाण्याचा मुख्य प्रवाह आहे. त्याचबरोबर विहिरी, कूपनलिका, पारंपरिक झरे हे पाण्याचे मुख्य स्रोत आहेत. बहुतांश गावांत किमान २० लिटर पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे.
मात्र, २१ गावांत पाण्याचे स्रोत कमी होत चालल्याने किमान २० लिटर पाणी मिळण्यात अडचणी येत आहेत; परंतु या गावांत जनावरे व कपडे धुण्यासाठी अवांतर खर्चासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने पिण्याच्या पाण्यावर परिणाम जाणवत आहे.
यामध्ये हरपवडे, धनगरवाडा, वझरे कुसळवाडी, सुळेरान, माऊली हायस्कूल वसाहत, पेरणोलीपैकी नावलकरवाडी, एरंडोळ, शेवाळेवस्ती, इटे तेजमवस्ती, गणेशवाडी वस्ती, वाटंगी धनगरवाडे, चाफवडे आदर्श वसाहत, रायवाडा वसाहत, सोहाळेपैकी बाची, दोरुगडेवाडी या वाड्या-वस्त्यांवर, तर बहिरेवाडी, किणे, पारपोली, खेडगे, मलिग्रे, चितळे,
सिरसंगी, आर्दाळ या गावात पाणीटंचाई जाणवत आहे.
चंदगड तालुक्यात आठ गावांत पाण्याचे दुर्भिक्ष
निसर्गाची देणगी लाभलेल्या चंदगड तालुक्यात अलीकडच्या दोन दशकांत भरपूर पाणीसाठा झाला आहे. तालुक्यात ११८६६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. पावसाळ्यात सरासरी ३६०० मि.मी. पावसाची नोंद होते. राज्यात इतरत्र पाऊस कमी झाला असला तरी चंदगडला सरासरीपेक्षा जादा पाऊस झाल्याने सर्वच धरणे १०० टक्के भरली आहेत. तालुक्यातील जंगमहट्टी, फाटकवाडी, जांबरे या तीन लघु प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे.
तालुक्यातील घटप्रभा, ताम्रपर्णी व इतर उपनद्यांना बारमाही पाणी वाहते. त्यामुळे गावागावांतील नळ पाणीपुरवठा करणाºया योजना कधीही कोरड्या पडल्या नाहीत. जंगमहट्टी व फाटकवाडी धरण नव्हते त्यावेळी तालुक्यातील अनेक गावे पाणी टंचाईग्रस्त होती. मात्र, अलीकडे तालुक्यातील केवळ बोंजुर्डीपैकी मोरेवाडी, मजरे जट्टेवाडी, मौजे जट्टेवाडी गावठाण, देवरवाडी गावठाण, सुरुते गावठाण, शिनोळी बु. गावठाण, कलिवडे पैकी धरनगरवाडा, तुडये पैकी मळवीवाडी या गावांत भीषण पाणीटंचाई आहे.
एप्रिल व मे मध्ये दिवस-रात्र भारनियमनाचे मोठे संकट तालुक्यावर असते. त्यामुळे गावातील पाणीपुरवठा करणारे विद्युतपंप बंद झाल्याने पाणी सेवा विस्कळीत झाली आहे. काही ग्रामपंचायतींकडे पुरेसा निधी नसल्याने वीज बिले भरली नसल्याने पाण्याच्या मोटारींचे वीज कनेक्शन तोडले आहे, अशा अनेक कृत्रिम कारणांनी गावांना पाणी मिळत नाही. नवीन नळ पाणीपुरवठा योजनांच्या ठेक्यावरून ग्रा. पं. सदस्यांमध्ये वाद असल्याने चार-चार वर्षे योजना रखडल्याची उदाहरणे आहेत. अशी कृत्रिम टंचाई वगळता बहुतांश गावांत पाणी भरपूर आहे. बुक्किहाळ, कौलगे, होसूर येथे नवीन नळपाणी योजना मंजूर झाली आहे.
पन्हाळ्यात पाणीसंकट
पन्हाळा तालुका हा दुर्गम व डोंगराळ असल्याने तालुक्यात बहुतांशी गावांना डोंगरदºयातील झºयांच्या पाण्याचाच आधार घ्यावा लागत आहे. काही गावांत गावविहिरी, बोअरवेलने पाणीपुरवठा होतो. मात्र, उन्हाळ्यात गावविहिरींची व जमिनीच्या खालील पाणीपातळी खालवल्याने झºयांचे पाणी आटले असल्याने अनेक गावे व वाड्या पाण्यासाठी तहानलेल्या दिसत आहेत. संभाव्य टंचाई असलेली गावे व वाड्यांची संख्या जास्त असली