Kolhapur: जीव घेतल्यानंतरही बालिकेवर अत्याचार, शिये प्रकरणातील संशयितांचा क्रूरपणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 01:16 PM2024-08-30T13:16:25+5:302024-08-30T13:17:30+5:30

दुसऱ्या दिवशी जाऊन मृतदेहाची पाहणी, संशयिताची पोलिस कोठडीत रवानगी

Abuse of girl even after taking her life, brutality of suspects in Shiye case kolhapur | Kolhapur: जीव घेतल्यानंतरही बालिकेवर अत्याचार, शिये प्रकरणातील संशयितांचा क्रूरपणा

Kolhapur: जीव घेतल्यानंतरही बालिकेवर अत्याचार, शिये प्रकरणातील संशयितांचा क्रूरपणा

कोल्हापूर : शिये (ता. करवीर) येथील शेतात नेऊन बालिकेवर लैंगिक अत्याचार आणि खून करणाऱ्या संशयितांनी दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली. ठार मारल्यानंतरही नराधमांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. अटकेतील दोन्ही संशयितांची 'क्राईम हिस्ट्री' जाणून घेण्यासाठी पोलिसांचे पथक लवकरच बिहारला जाणार आहे. दरम्यान, दुसरा संशयित राहुल कुमार सिंग (वय १९, रा. बिहार) याची पोलिस कोठडीत रवानगी झाली.

पीडित बालिकेचा नातेवाइक दिनेश साहा आणि त्याचा साथीदार राहुल कुमार सिंग हे दोघे गेल्या काही दिवसांपासून पीडित मुलीला मोबाइलवर अश्लील चित्रफिती दाखवत होते. ती या दोघांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करीत असल्याने दोघांनी तिला मारहाण केली. बुधवारी (दि. २१) दुपारी नारळ काढण्याच्या बहाण्याने संशयित आरोपी पीडित मुलीला घरातून घेऊन गेले. शेतात निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

त्यानंतर गळा आवळून आणि लाथा-बुक्क्या मारून तिला ठार मारले. किळसवाणा आणि चीड आणणारा प्रकार म्हणजे बालिका ठार झाल्यानंतरही तिच्यावर अत्याचार केले. घटनेनंतर घरी परतलेले दोघे संशयित रात्रपाळीच्या कामावर गेले. त्यानंतर सकाळी परत आल्यानंतर दोघांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली, अशी माहिती चौकशीत समोर आली.

 क्राईम हिस्ट्रीचा शोध सुरू

या गुन्ह्यातील दुसरा संशयित राहुल कुमार सिंग हा १५ दिवसांपूर्वीच शिये येथे आला. दिनेश साहा याचा तो मित्र आहे. गुन्ह्याची पद्धत पाहता या दोघांवर आणखी काही गुन्हे असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. दोघांची क्राईम हिस्ट्री शोधण्यासाठी पोलिसांचे एक पथक बिहारला रवाना होणार आहे.

नशेत केला गुन्हा?

बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करणे आणि पुन्हा तिचा मृतदेह पाहण्यासाठी जाणारे दोन्ही संशयित नशेखोर असावेत, असा पोलिसांना संशय आहे. गुन्हा करताना ते नशेत होते काय? याची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Abuse of girl even after taking her life, brutality of suspects in Shiye case kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.