तुळशी नदीवरील बंधाऱ्याचे बरगे काढण्याच्या कामाला वेग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 01:27 PM2021-06-06T13:27:32+5:302021-06-06T13:29:09+5:30

Irrigation Rain Dam Kolhapur : गेल्या चार दिवसापासून धामोड परिसरामध्ये पावसाची रिपरिप सुरू झाल्याने नदी-नाले प्रवाहित होण्यास सुरूवात झाली आहे. सततच्या पावसाने शेती सिंचनासाठी सुरू असणारे विद्यूत पंप ही शेतकऱ्यांनी बंद करून ठेवल्याने आता पाणी ऊपसा बंद झाला आहे . त्यामुळे तुळशी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना पाणी अडवण्यासाठी घातलेले बरगे काढण्याची लगबग सुरू आहे.

Accelerate the work of removing the embankments on the Tulsi river! | तुळशी नदीवरील बंधाऱ्याचे बरगे काढण्याच्या कामाला वेग!

धामोड (ता. राधानगरी) येथील तुळशी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना बसवलेले बरगे काढण्याच्या कामाला पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली आहे.  (छाया : श्रीकांत ऱ्हायकर)

Next
ठळक मुद्देतुळशी नदीवरील बंधाऱ्याचे बरगे काढण्याच्या कामाला वेग!

श्रीकांत ऱ्हायकर

धामोड : गेल्या चार दिवसापासून धामोड परिसरामध्ये पावसाची रिपरिप सुरू झाल्याने नदी-नाले प्रवाहित होण्यास सुरूवात झाली आहे. सततच्या पावसाने शेती सिंचनासाठी सुरू असणारे विद्यूत पंप ही शेतकऱ्यांनी बंद करून ठेवल्याने आता पाणी ऊपसा बंद झाला आहे . त्यामुळे तुळशी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना पाणी अडवण्यासाठी घातलेले बरगे काढण्याची लगबग सुरू आहे.

तुळशी धरणापासून ते आरे -बीड पर्यंतच्या तुळशी नदीकाठावरील शेतकऱ्यांना तुळशी धरणातील पाण्याचा शेती सिंचनाबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होतो . साधारणतः नोव्हेंबरपासून तुळशी धरणातील पाणी तुळशी नदीपात्रात सोडण्यास सुरुवात होते. या पाण्यावरती साधारणतः ४९२० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते .२३ गावांना या पाण्याचा उपयोग करून शेती पिकवता येते. धरण परिसरात वर्षभरामध्ये सरासरी १७७८ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद होत असते. पण तरीही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या काठावरील शेती सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनतो.

यावरती ठोस उपाय म्हणून या नदीपात्र वरती तुळशी धरणापासून ते आरे बीड पर्यंत नऊ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले. व या बंधाऱ्यांना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बरगे बसवून पाणी अडविण्यात येते. परिणामी तुळशी नदी काठावरील सर्व शेती हिरवीगार होते. आत्ता पावसाळ्याचे दिवस जवळ आले असून नदी-नाले हळूहळू प्रवाहित होऊ लागले आहेत. त्यातच गेल्या चार दिवसापासून धामोड परिसरात पावसाची रिपरिप सुरू झाल्याने पाटबंधारे विभागाने या बंधाऱ्यांना बसवलेले बरगे काढण्याच्या कामाला सुरुवात केली आहे .

 

Web Title: Accelerate the work of removing the embankments on the Tulsi river!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.