सत्तारूढची मौलिक गुंतवणूक स्वीकारा, पण मतदान कप-बशीलाच करा; पालकमंत्री सतेज पाटील : कागलला विरोधी आघाडीचा मे‌ळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:19 AM2021-04-29T04:19:02+5:302021-04-29T04:19:02+5:30

कागल : सत्तारूढ आघाडी ठरावधारकांत मौलिक गुंतवणूक करत आहे. ही गुंतवणूक शेतकऱ्यांच्या घामातून निर्माण झालेली आहे. त्यामुळे ही मौलिक ...

Accept the fundamental investment of the ruling party, but do it in the voting cup-basin; Guardian Minister Satej Patil: Kagal should meet the opposition | सत्तारूढची मौलिक गुंतवणूक स्वीकारा, पण मतदान कप-बशीलाच करा; पालकमंत्री सतेज पाटील : कागलला विरोधी आघाडीचा मे‌ळावा

सत्तारूढची मौलिक गुंतवणूक स्वीकारा, पण मतदान कप-बशीलाच करा; पालकमंत्री सतेज पाटील : कागलला विरोधी आघाडीचा मे‌ळावा

googlenewsNext

कागल : सत्तारूढ आघाडी ठरावधारकांत मौलिक गुंतवणूक करत आहे. ही गुंतवणूक शेतकऱ्यांच्या घामातून निर्माण झालेली आहे. त्यामुळे ही मौलिक गुंतवणूक स्वीकारा, पण मतदान मात्र कप-बशीलाच करा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी बुधवारी येथे केले.

कागलमध्ये राजर्षी शाहू शेतकरी विरोधी आघाडीच्या प्रचारात ते बोलत होते. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व खासदार संजय मंडलिक प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, सत्तारूढ पॅनेलच्या उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना पराभवाची चाहूल लागलेली आहे. सध्या सत्तारूढ पॅनेलचे उमेदवार व्यक्तिगत "सिंगल" मते मागत फिरत आहेत. सत्तारूढ गटाने निवडणूक कशी पुढे जाईल, यासाठी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयामध्ये गोकुळ संस्थेमार्फत व नंतर काही संस्थांमार्फत याचिका दाखल करून प्रयत्न केले. परंतु; आमची न्यायाची बाजू असल्यामुळे त्यांना यश आले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांनी केलेला कोट्यवधीचा खर्च व शेवटची धडपडही व्यर्थ ठरली. या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्यात आत्मविश्वास राहिलेला नाही. विरोधी आघाडीला सर्व तालुक्यातील ठरावधारकांचे भक्कम पाठबळ मिळत असल्याने विजय निश्चित आहे.

जावयालाच एजन्सी देऊन लूट

मुंबईला दूध वाहतुकीसाठी स्वतःचे टँकर्स गोकुळमध्ये लावले. मुंबईच्या दुधामधून कोट्यवधी रुपये कमिशन घेतले, लोण्याचा बाजार पॅनेल प्रमुखांनी मांडला. पुण्यामध्ये स्वतःच्या जावयालाच दुधाची एजन्सी देऊन वर्षाला कोट्यवधी रुपये हुंड्याची तजवीज करून दिली, असा आरोपही पालकमंत्र्यांनी केला.

हॉटेलची नव्हे, दुधाच्या टँकरची बिले

दोन दिवसांपूर्वी मुरगूडला सत्तारूढ आघाडीच्या मेळाव्यात आमदार पी. एन. पाटील म्हणाले होते, "हॉटेलची बिले दाखवा, आम्ही राजकारण सोडतो." त्यांच्या या वक्तव्याचा संदर्भ घेत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, हॉटेलच्या जेवणांच्या बिलाबाबत आमच्या पॅनेलच्या कुणीही मुद्दाच उपस्थित केलेला नाही. पालकमंत्री सतेज पाटील यांनी महादेवराव महाडिक आणि इतर नेतेमंडळींच्या दुधाच्या टँकरची बिले दाखवली होती. त्याचे उत्तर द्या.

२८०४२०२१-कोल-सतेज पाटील मेळावा

कागलमध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रचार मेळाव्यात बुधवारी पालकमंत्री सतेज पाटील यांचे भाषण झाले. यावेळी ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक व उमेदवार उपस्थित होते.

Web Title: Accept the fundamental investment of the ruling party, but do it in the voting cup-basin; Guardian Minister Satej Patil: Kagal should meet the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.