Accident News: काॅलेजबसला टेंपोची समोरासमोर धडक; २ जणांचा जागीच मृत्यू; २० विद्यार्थी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 11:06 PM2022-08-20T23:06:10+5:302022-08-20T23:06:32+5:30
Accident News: बेळगाव जिल्ह्यातील अथणी-मिरज रोडवर टेम्पो व कॉलेज बसची मोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक ठार तर 20 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे.
कोल्हापूर - बेळगाव जिल्ह्यातील अथणी-मिरज रोडवर टेम्पो व कॉलेज बसची मोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक ठार तर 20 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. या अपघातातील जखमी झालेले अनेक विद्यार्थी गंभीर जखमी असून ते अकरावी आणि बारावीच्या वर्गात शिकत होते. सकाळी कॉलेजवर विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना हा अपघात झाला आहे. टेंपोने स्कुल बसला दिलेली धडक इतकी भयानक होती, की, दोन्हीही वाहानातील चालक जागीच ठार झाले असून बसमधील ड्रायव्हरच्या केबिनमध्ये बसलेले विद्यार्थी आणि शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. कॉलेजबसच्या केबिनमध्ये बसलेल्या एका शिक्षकाचा हात आणि पायही तुटला असून शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथे हा अपघात घडला असून अपघातानंतर काही वेळातच त्याठिकाणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
अथणी-मिरज मार्ग
अथणी-मिरज रोडवर तीन किलोमीटर अंतरावर बनजवाड येथे हायस्कूल आणि कॉलेज आहे. शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास विद्यार्थ्यांना अथणी येथून घेऊन बस कॉलेजकडे निघाली होती. त्याचवेळी मिरजकडून अथणीकडे प्लास्टिक पाईप भरलेला आयशर टेम्पो येत होता.
दोन्ही ड्रायव्हर ठार
अथणी शहरालगतच दोन्ही वाहनांमध्ये हा अपघात झाला. समोरासमोरा धडक बसल्याने दोन्ही वाहनाचे चालक जागीच ठार झाले, अपघातात वाहनाचे चालक ठार होताच स्कुलबसमधील मुलांनी हंबरडा फोडला होता. मालवाहतूक करणाऱ्या टेंपोने कॉलेजबसला धडक दिल्याने दोन्ही वाहनांच्या समोरील केबिनचा चक्काचूर झाला होता. दोन्ही वाहनं समोरासमोर धडकल्याने दोन्हीवाहनातील ड्रायव्हर वाहनामध्येच अडकून पडले होते.
शिक्षकांचा हात-पाय तुटला
या भीषण अपघातात बसमधून प्रवास करणाऱ्या एका शिक्षकांचा हात आणि पाय तुटला आहे, तर बस चालकाच्या बाजूला बसून प्रवास करणारे काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. आमदार श्रीमंत पाटील यांनी घटनास्थळी आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णवाहिका पाठवून तातडीने जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात पोचवण्याचे काम केले आहे. घटनास्थळी पोलीस अपघाताची चौकशी करत आहेत.