निवडणुक यंत्रणा व कर्मचा-यांना घेऊन निघालेल्या एसटीला अपघात-: विरमाडे हद्दीत ट्रकची जोरदार धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 02:52 PM2019-10-22T14:52:11+5:302019-10-22T14:53:34+5:30
कर्मचा-यांना मात्र कोणतीही दुखापत झाली नाही. अपघातात मालवाहतूक करणारा ट्रकचालक जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे.
पाचवड : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर विरमाडे हद्दीत निवडणुकीतील मतदान प्रक्रिया संपल्यानंतर साहित्य व कर्मचाºयांना घेऊन निघालेली एसटी व मालट्रक यांच्या अपघात झाला. हा अपघात मंगळवारी, रोजी पहाटे तीनच्या सुमारास झाला. यात ट्रक चालक जखमी झाला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा आगारातील चालक संदीप चव्हाण हे एसटी बस (एमएच ११ बीएल ९२९८) मधून मतदानाचे साहित्य घेऊन भुर्इंज येथील विविध गावांमधील ईव्हीएम मशिन एकत्रित करून त्या वाई येथे पोहोचले. त्यानंतर पुन्हा मतदान ठिकाणच्या गावामधील मतदान कर्मचारी व साहित्य घेऊन सातारा येथे जात असताना विरमाडे हद्दीत आला असता ट्रक (एमएच ०९ ईएम ७२२४) याने एसटीला पाठीमागून जोरदार धडक दिली.
एसटी बसला जोरात धडक बसल्याने एसटी पुढे घसरत जाऊन डिव्हाईडरला धडकल्याने तिचे मोठे नुकसान झाले. यावेळी एसटीमध्ये पाच ते सहा कर्मचारी होते. या अपघातात सदर कर्मचा-यांना मात्र कोणतीही दुखापत झाली नाही. अपघातात मालवाहतूक करणारा ट्रकचालक जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे.