कोल्हापूर: भाच्याच्या बारशाहून परताना आत्याचा अपघाती मृत्यू, ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 07:08 PM2022-10-31T19:08:36+5:302022-10-31T19:08:57+5:30

मुलगी आणि भाऊ जखमी

Accidental death of nephew while returning from Barsha in kolhapur | कोल्हापूर: भाच्याच्या बारशाहून परताना आत्याचा अपघाती मृत्यू, ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

कोल्हापूर: भाच्याच्या बारशाहून परताना आत्याचा अपघाती मृत्यू, ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

Next

शिवाजी सावंत

गारगोटी: उसाने भरलेल्या ट्रॅक्टरचा धक्का लागून भाच्याच्या बारशाला गेलेल्या आत्याचा अपघाती मृत्यू झाला. साधना पांडूरंग चोरगे (वय २४, रा. अंतुर्ली, ता. भुदरगड) असे मृत महिलेचे नाव आहे. तर त्यांची मुलगी आणि भाऊ जखमी झाले. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक शिवाजी उत्तम डाफळे (रा. निळपण, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रोहित आनंदा कामते यांनी भुदरगड पोलिसात फिर्याद दिली.

अधिक माहिती अशी की, बसरेवाडी ता. भुदरगड येथे आश्रम कामते यांच्या मुलाचे काल, रविवारी बारसे होते. या बारशासाठी आश्रम यांची बहीण साधना चोरगे आल्या होत्या. नामकरण सोहळा पार पडल्यावर दुपारी भाऊ आश्रम हा बहिण साधना आणि तिची एक वर्षाची मुलगी आर्या यांना घेवून दुचाकीवरून गावी करंजिवणे ता.कागल येथे निघाला होता. दारवाड कुर रस्त्यावर कोनवडे गावाजवळ ऊसाने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीला ओव्हरटेक करुन पुढे जात असताना त्यांच्या दुचाकीला धक्का लागून ते रस्त्याच्या डाव्या बाजूला पडले.

या अपघात साधना गंभीर जखमी झाल्या. तर आर्या व आश्रम हे देखील गंभीर जखमी झाले. तिघांनाही कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, साधना यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तरुण विवाहितेच्या अपघाती निधनाने माहेर करंजिवणे, सासर अंतूर्ली तर बारसे असलेल्या बसरेवाडी या तीन गावांवर शोककळा पसरली. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Accidental death of nephew while returning from Barsha in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.