तिळवणीच्या तरुणाचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:12 AM2020-12-28T04:12:58+5:302020-12-28T04:12:58+5:30
जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर बायपास महामार्गावर जैनापूर (ता. शिरोळ) येथे कार व मोपेडमध्ये झालेल्या अपघातातील जखमी विशाल शंकर ...
जयसिंगपूर :
सांगली-कोल्हापूर बायपास महामार्गावर जैनापूर (ता. शिरोळ) येथे कार व मोपेडमध्ये झालेल्या अपघातातील जखमी विशाल शंकर वडर (वय ३०, रा. तिळवणी, ता. हातकणंगले) यांचा शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दीपक तुकाराम वडर (वय ३५, रा. तिळवणी) यांचीही प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलिसांत झाली आहे. गुरुवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास विशाल वडर व दीपक वडर हे मोपेडवरून सांगली येथून तिळवणीकडे जात होते. दरम्यान, सांगली-कोल्हापूर बायपास महामार्गावर जैनापूर येथे भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले.दरम्यान, सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल उपचार सुरू असताना विशाल वडर यांचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. अपघातप्रकरणी कारचालक अमित आप्पासो तांदळे ( रा. सांगली)याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार तानाजी रामा वडर यांनी शनिवारी रात्री पोलीसांत दिली.