कोल्हापूर रेल्वे स्टेशनचा ‘पीपीपी’ मॉडेलनुसार पुनर्विकास, संभाजीराजेंच्या प्रश्नाला केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचे उत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 04:36 PM2018-01-06T16:36:59+5:302018-01-06T16:43:28+5:30
कोल्हापूर रेल्वे स्टेशनचा सार्वजनिक खासगी सहभागातून पुनर्विकास करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी राज्यसभेत दिली. खासदार संभाजीराजे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. गोयल म्हणाले, संपूर्ण देशामध्ये (पीपीपी मॉडेल) सार्वजनिक-खासगी सहभागातून ४०० रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास होणार असून यामध्ये कोल्हापूरसह महाराष्ट्रातील ४० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे. कोल्हापूर रेल्वे स्टेशनचा सार्वजनिक खासगी सहभागातून पुनर्विकास करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी राज्यसभेत दिली. खासदार संभाजीराजे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. गोयल म्हणाले, संपूर्ण देशामध्ये (पीपीपी मॉडेल) सार्वजनिक-खासगी सहभागातून ४०० रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास होणार असून यामध्ये कोल्हापूरसह महाराष्ट्रातील ४० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर रेल्वे स्टेशनचा सार्वजनिक खासगी सहभागातून पुनर्विकास करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी राज्यसभेत दिली. खासदार संभाजीराजे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
गोयल म्हणाले, संपूर्ण देशामध्ये (पीपीपी मॉडेल) सार्वजनिक-खासगी सहभागातून ४०० रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास होणार असून यामध्ये कोल्हापूरसह महाराष्ट्रातील ४० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे.
सध्या देशभरातील २३ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम ‘पीपीपी मॉडेल’च्या माध्यमातून पूर्ण होत असून उर्वरित रेल्वे स्थानकांच्या विकासाचे काम लवकरच सुरू होईल, अशी माहितीसुद्धा रेल्वेमंत्र्यांनी राज्यसभेत संभाजीराजे यांना दिली.
रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाबाबत ‘पीपीपी मॉडेल’चा अवलंब करून ज्या स्थानकांची निवड केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने उत्पन्न साधन, रेल्वेयात्रीची संख्या व त्या ठिकाणचा योजनाबद्ध विकास आदी गोष्टींचा विचार केला गेला आहे, असेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.