नवीन अभ्यासक्रमानुसार १ लाख ४१ हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 11:28 AM2019-02-27T11:28:06+5:302019-02-27T11:30:03+5:30

नवीन अभ्यासक्रमानुसार दहावीची यावर्षी पहिलीच परीक्षा होणार आहे. कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील एकूण १ लाख ४१ हजार ७० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २९०६ इतकी आहे. या परीक्षेचा प्रारंभ शुक्रवारी (दि. १ मार्च) सकाळी ११ वाजता मराठी विषयाच्या पेपरने होणार आहे.

According to the new syllabus, 1 lakh 41 thousand students will be given the SSC examination | नवीन अभ्यासक्रमानुसार १ लाख ४१ हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

नवीन अभ्यासक्रमानुसार १ लाख ४१ हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

Next
ठळक मुद्देनवीन अभ्यासक्रमानुसार १ लाख ४१ हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षाजुन्या अभ्यासक्रमाचे २९०६ विद्यार्थी; प्रवेशपत्रांचे आॅनलाईन वितरण

कोल्हापूर : नवीन अभ्यासक्रमानुसार दहावीची यावर्षी पहिलीच परीक्षा होणार आहे. कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील एकूण १ लाख ४१ हजार ७० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २९०६ इतकी आहे. या परीक्षेचा प्रारंभ शुक्रवारी (दि. १ मार्च) सकाळी ११ वाजता मराठी विषयाच्या पेपरने होणार आहे.

या परीक्षेत गणित आणि इंग्रजी विषयाची बहुसंच प्रश्नपत्रिका पद्धत यावर्षीपासून बंद झाली आहे. नवीन अभ्यासक्रम आणि बदललेल्या मूल्यमापन पद्धतीनुसार पहिलीच परीक्षा होणार आहे. कोल्हापूर विभागातील एकूण ३५४ केंद्रांवर परीक्षा होणार असून, त्यावर २१ भरारी पथकांची नजर राहणार आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी सात भरारी पथके असणार आहेत.

विभागातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांची प्रवेशपत्रे आॅनलाईन पद्धतीने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिली आहेत. परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे शिक्षण मंडळाचे विभागीय सहसचिव टी. एल. मोळे यांनी सांगितले.

आकडेवारी दृष्टिक्षेपात
जिल्हा             विद्यार्थी (नवीन अभ्यासक्रम)    परीक्षा केंद्र
कोल्हापूर                ५६७५८                                  १३६
सांगली                   ४१२७६                                  १०३
सातारा                    ४३०३४                                 ११५

 

 

Web Title: According to the new syllabus, 1 lakh 41 thousand students will be given the SSC examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.