पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ‘नेटवर्किंग मार्केटिंग’च्या दोघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:32 AM2021-02-25T04:32:08+5:302021-02-25T04:32:08+5:30
कोल्हापूर : नेटवर्किंग मार्केटिंग कंपनीमध्ये रक्कम गुंतवणूक करण्यास भाग पाडून फसवणूक झाल्याने आपल्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली, त्याबद्दल ...
कोल्हापूर : नेटवर्किंग मार्केटिंग कंपनीमध्ये रक्कम गुंतवणूक करण्यास भाग पाडून फसवणूक झाल्याने आपल्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली, त्याबद्दल कंपनीच्या दोघांना जबाबदार धरून त्यांच्याविरोधात शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार कृष्णात प्रकाश गोंड (३३, रा. खोतवाडी, पो. माजगाव, ता. पन्हाळा) व किरण कांबळे-देसाई (रा. माजगाव, ता. पन्हाळा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आसुर्ले येथील युवराज बाळू माने यांनी ७ नोव्हेंबर २०२० रोजी कोल्हापुरात शाहुपुरीतील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याप्रकरणी मृत माने यांच्या पत्नी अर्चना युवराज माने (२८, रा. आसुर्ले) यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री तक्रार दिली. मृत युवराज माने यांनी पत्नीचे दागिने विकून ते पैसे नेटवर्किंग मार्केटिंग कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास कृष्णात गोड व किरण कांबळे-देसाई यांंनी भाग पाडले. त्यानंतर मानेंना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप त्यांची पत्नी अर्चना माने यांनी पोलिसांत केला. त्यानुसार शाहुपुरी पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल झाला.