आरोपीला दोन महिन्यात फाशीची शिक्षा दिल्याचा दावा.. विरोधकांची टीका...आता CM शिंदेंनी कोर्टाचे पेपरच दाखवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 17:48 IST2024-08-22T17:41:41+5:302024-08-22T17:48:35+5:30
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रत्नागिरीतील एका सभेत बोलताना एका आरोपीला दोन महिन्यात शिक्षा दिल्याचा दावा केला होता.

आरोपीला दोन महिन्यात फाशीची शिक्षा दिल्याचा दावा.. विरोधकांची टीका...आता CM शिंदेंनी कोर्टाचे पेपरच दाखवले
CM Eknath Shinde ( Marathi News ) : बदलापूर येथील अत्याचार प्रकरणावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रत्नागिरीतील एका सभेत एका आरोपीला दोन महिन्यात शिक्षा सुनावल्याचा दावा केला. शिंदे यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदेंच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका सभेत या शिक्षेचे कोर्टातील पुराव्याचे कागदपत्र दाखवत प्रत्युत्तर दिले.
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; विधानसभेपूर्वी राजकीय खलबतं?
आज कोल्हापूरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. "दोन-चार महिन्यापूर्वी पुण्याच्या मावळमध्ये एक अशी केस झाली होती. त्या केसमध्ये आरोपीला फाशी झाली होती. आता विरोधक म्हणतात, अशी कुठली फाशी झालीच नव्हती. त्यावर आज दिवसभर चर्चा सत्र सुरू आहे. पण मी आपल्याला सांगतो, मी कधीही दिलेला शब्द पाळणारा आहे. तुमचा हा एतनाथ शिंदे भाऊ कधीही खोटं न बोलणारा भाऊ आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, ही घटना मावळची आहे. मे २०२४ मध्ये तेजस दळवी याला फाशीची शिक्षा झाली, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
यावेळी सीएम शिंदे यांनी कोर्टाचे कागदही दाखवले आणि म्हणाले, पोलिसांनी या प्रकरणात काम केलं. ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवली. माझ्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
'तो' खटला कोणता?
मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला प्रकार मावळमध्ये घडलेला आहे. ६ वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या एका संतापजनक प्रकरणात फास्ट ट्रॅकवर न्याय देण्यात आला. याचा घटनाक्रम खालील प्रमाणे
गुन्ह्याची तारीख - ०२/०८/२०२२
एफआयआर दाखल करण्यात आलेली तारीख - ०२/०८/२०२२
गुन्हेगाराला अटक करण्यात आलेली तारीख - ०३/०८/२०२२
आरोप पत्र दाखल करण्यात आलेली तारीख - १२/०९/२०२२
तपास पूर्ण - एफआयआर दाखल झाल्यानंतर ४० दिवसात
आरोपपत्र दाखल करण्यात आले - १६ / ३ / २०२३ ( ६ महिन्यांत)
आरोपनिश्चिती झाल्यानंतर दोन महिन्यात साक्षी पुराव्यांची तपासणी सुरू - १२ / ०५ / २०२३
निर्णयाची तारीख - २२ /०३ / २०२४