‘जेईई मेन्स’मध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 12:33 AM2019-05-01T00:33:57+5:302019-05-01T00:34:03+5:30

कोल्हापूर : नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) घेण्यात आलेल्या जेईई-मेन्स २०१९ चा निकाल सोमवारी (दि. २९) रात्री आॅनलाईन जाहीर झाला. ...

The achievements of students of Kolhapur in 'JEE Mains' | ‘जेईई मेन्स’मध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांचे यश

‘जेईई मेन्स’मध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांचे यश

Next

कोल्हापूर : नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) घेण्यात आलेल्या जेईई-मेन्स २०१९ चा निकाल सोमवारी (दि. २९) रात्री आॅनलाईन जाहीर झाला. या परीक्षेत कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी धवल यश मिळविले. त्यामध्ये चाटे शिक्षण समूह, पेठेज अकॅडमी, डाईस अकॅडमी, आदी संस्था, क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या गुणवंतांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
देशभरातील आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी, सीएफटीआय, एसएफटीआय, राज्य पातळीवरील अभियांत्रिकी कॉलेज या संस्थांमधील प्रवेश जेईई मेन्स आणि अ‍ॅडव्हान्स या परीक्षांंच्या आधारे पूर्ण केले जातात. त्यामध्ये चाटे शिक्षण समूहाच्या २१७ विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. पेठेज अकॅडमीच्या १८ विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. त्यामध्ये (कंसात मिळालेले पर्सेंटाईल) : सुश्लोक शहा (९९.२४), यश कुंडाळे (९९.८), दर्शन शहा (९८.१), ऋत्वीज चिपळूणकर (९७), निखिल खावणेकर (९५.३), ओमकार विराळेकर (९५.२), सचिन कुलकर्णी (९३.८), अनिकेत भोईटे (९३.७), सुनित कांबळे (९१.६०), सानिका कालोरकर (९१.५३), केदार दळवी (९१.५१), अनीश बेर्डे (९५), ओमकार भावे (९१.५) ईश्वरी चौगुले (९०.५७) ज्योत्स्ना बारदेसकर (९०.१०), नेहा देवधर (८४.५५) गौरव गडकरी (८४.६६), रोहित कोकरे (७८.९३) यांचा समावेश आहे. त्यांना अकॅडमीचे संचालक डॉ. प्रकाश पेठे, सुनील पेठे यांचे मार्गदर्शन लाभले. डाईस अकॅडमीच्या आर्यन बस्तानी (९६.१८), अनुप ठाकूर (९१.९३), अखिलेश कांबळे (६५), अथर्व डोईफोडे यांनी यश मिळविले आहे. त्यांना अकॅडमीच्या संचालिका दिशा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

२७ मे रोजी
‘जेईई अ‍ॅडव्हान्स’
या परीक्षेतून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी जेईई-अ‍ॅडव्हान्स ही परीक्षा दि. २७ मे रोजी होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची मुदत
दि. ३ ते ९ मे यादरम्यान आहे.

Web Title: The achievements of students of Kolhapur in 'JEE Mains'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.