ध्वनिप्रदूषण घटले, पण मर्यादा ओलांडली

By Admin | Published: November 3, 2016 12:40 AM2016-11-03T00:40:18+5:302016-11-03T00:40:18+5:30

शहरात २२ ठिकाणी पाहणी : शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाची दिवाळीच्या कालावधीत नोंदी

Acoustic noise decreased, but the limit exceeded | ध्वनिप्रदूषण घटले, पण मर्यादा ओलांडली

ध्वनिप्रदूषण घटले, पण मर्यादा ओलांडली

googlenewsNext

 कोल्हापूर : गेल्या चार वर्षांच्या तुलनेत या वर्षीच्या दिवाळीत कोल्हापूर शहरांच्या विविध भागांमध्ये फटाक्यांचा आवाज कमी राहिल्याने ध्वनिप्रदूषण घटले आहे. मात्र, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक पातळीपेक्षा ते अधिकच असल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांनी बुधवारी येथे दिली. दिवाळीच्या कालावधीत लक्ष्मीपूजनादिवशी सर्वाधिक आवाजाची नोंद झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाने या वर्षी औद्योगिक, व्यावसायिक, रहिवासी आणि शांतता क्षेत्रनिहाय शहरातील २२ ठिकाणी दि. २८ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान पाहणी केली. सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत ध्वनिप्रदूषणाच्या नोंदी घेतल्या. लोकांमध्ये प्रदूषणाबाबत झालेली जागृती यामुळे फटाक्यांचा आवाज कमी झाला आहे. पण, प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेल्या मर्यादा फटाक्यांच्या आवाजाने ओलांडल्या आहेत. रात्रीच्या वेळेत राजारामपुरी, उत्तरेश्वर पेठ, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, नागाळा पार्क, गुजरी, गंगावेश, उद्यमनगर, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी परिसरात अधिक फटाके वाजले आहेत.
गेल्या चार वर्षांच्या तुलनेत संबंधित परिसरातील ध्वनिप्रदूषणात एक ते दोन डेसिबलची वाढ झाली आहे. यामध्ये पाहता अधिकतर परिसरात ध्वनिप्रदूषण कमी होत असल्याचे दिसत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय या शांतता क्षेत्रातदेखील आवाजाची किमान मर्यादा पार केली आहे. लक्ष्मीपूजनादिवशी फटाके अधिक वाजले आहेत. ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी डॉ. ए. एस. जाधव, एस. बी. मांगलेकर, पल्लवी भोसले, अक्षय पाटील, आकाश कोळेकर यांनी काम केले असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
परिसर २०१२ २०१६
दिवसा रात्री दिवसा रात्री
सीपीआर ८२.०२ ८०.०४ ६८.०४ ६३.०८
न्यायालय ७१.०४ ७६.०६ ७०.०० ६८.०९
जिल्हाधिकारी कार्यालय ६२.०३ ६८.०४ ७०.०७ ७२. ०१
शिवाजी विद्यापीठ ६०.०२ ६३.०७ ५५.०२ ५७. ०१
राजारामपुरी (रहिवासी) ६९.०५ ७४.०६ ६८.०८ ७६.०९
उत्तरेश्वर पेठ ६७.०३ ७०.०८ ७६.०६ ८०.०४
शिवाजी पेठ ७३.०३ ८१.०२ ७८.०४ ८३.०८
मंगळवार पेठ ७७.०४ ८२.०४ ७४.०० ८५.०८
नागाळा पार्क ६०.०५ ६२.०१ ६४.०८ ६९.०४
ताराबाई पार्क ५८.०४ ६१.०१ ६५.०३ ७८.०९
मिरजकर तिकटी ७८.०८ ८२.०९ ६९.०३ ८२.०१
दसरा चौक ७५.०२ ७८.०३ ७०.०५ ७३.०९
बिनखांबी गणेश मंदिर ८२.०७ ८६.०४ ७२.०४ ८४.०३
महाद्वार रोड ८५.०० ८९.०८ ७३.०८ ८४.०९
गुजरी ८३.०१ ८४.०१ ७४.०५ ८६.०८
पापाची तिकटी ८६.०७ ८६.०१ ७६.०९ ८१.०९
गंगावेश ७५.०५ ८१.०५ ७४.०५ ८५.०८
राजारामपुरी (व्यावसायिक) ७१.०४ ८२.०२ ७७.०३ ८५.०३
लक्ष्मीपुरी ७२.०५ ७६.०८ ७३.०९ ७८.०५
शाहूपुरी ७३.०४ ७८.०४ ७६.०७ ८८.०२
उद्यमनगर ८३.०३ ७९.०३ ८०.०९ ८३.०२
वाय. पी. पोवारनगर ८५.०१ ८८.०३ ७२.०३ ६५.०४
 

Web Title: Acoustic noise decreased, but the limit exceeded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.