विजयालक्ष्मी ट्रस्ट, शिल्प सागर ॲकॅडमीतर्फे अभिनय कृतज्ञता कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:29 AM2021-09-06T04:29:10+5:302021-09-06T04:29:10+5:30
कोल्हापूर : येथील विजयालक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट व शिल्प सागर ॲकॅडमी यांच्यावतीने भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ...
कोल्हापूर : येथील विजयालक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट व शिल्प सागर ॲकॅडमी यांच्यावतीने भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त (शिक्षक दिनानिमित्त) आयोजित अभिनय कृतज्ञता कार्यक्रमात धर्मादाय सहआयुक्त शशिकांत हेर्लेकर, अधीक्षक शिवराज नाईकवडे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. अरुण नरके फाउंडेशनच्या संचालिका स्निग्धा चेतन नरके या अध्यक्षस्थानी होत्या.
कार्यक्रमास इंडियन ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस कोल्हापूरचे चेअरमन विजय कोराणे, संजय घोडावत इंटरनॅशनशल स्कूलच्या प्राचार्य सस्मिता मोहंती हे प्रमुख उपस्थित होते. सूत्रसंचालक श्रुती भागवत यांनी केले. विजयालक्ष्मी ट्रस्ट व शिल्पसागर ॲकॅडमीकडून महाराष्ट्र व कर्नाटकातील ३२ शाळांचे उत्कृष्ट शिक्षक व प्राचार्य यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तिपत्रक देण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र सरनाईक, विश्वस्त सुनील गाताडे, ॲकॅडमीचे संचालक स्वाती सरनाईक यांच्यावतीने देण्यात आली. शिल्प सागर ॲकॅडमी हे कार्यक्रमाचे प्रायोजक होते.
फोटो नं.०५०९२०२१-कोल-विजयालक्ष्मी न्यूज
ओळ : विजयालक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट व शिल्प सागर ॲकॅडमीच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त प्राचार्य सस्मिता मोहंती यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.
050921\05kol_9_05092021_5.jpg
ओळ : विजयालक्ष्मी चॅरीटेबल ट्रस्ट व शिल्प सागर ॲकॅडमीच्यावतीने शिक्षक दिनानिमीत्त प्राचार्य सस्मिता मोहंती यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.