जिल्ह्यात १५४५ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:27 AM2021-05-07T04:27:12+5:302021-05-07T04:27:12+5:30

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या संचारबंदीत जिल्ह्यात रस्त्यावर नाहक फिरणाऱ्या १५४६ वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यापैकी १३३ ...

Action on 1545 vehicles in the district | जिल्ह्यात १५४५ वाहनांवर कारवाई

जिल्ह्यात १५४५ वाहनांवर कारवाई

Next

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या संचारबंदीत जिल्ह्यात रस्त्यावर नाहक फिरणाऱ्या १५४६ वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यापैकी १३३ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली, तर १४१३ वाहनधारकांकडून दोन लाख १७ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्हा प्रशासनाने संचारबंदी पुकारली आहे. या संचारबंदीत रस्त्यावर नाहक फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. गुरुवारी दिवसभरात कोल्हापूर शहरातही पोलिसांनी मोठ्या तीव्रतेने वाहन तपासणी मोहीम राबवली. शहरातील प्रमुख चौकात नाकाबंदी करून वाहनांची कागदपत्रे तपासणी मोहीम घेतली. यामध्ये नाहक फिरणाऱ्यांची वाहने जप्त केली, तर काहींना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांनी १४१३ वाहनधारकांकडून सुमारे दोन लाख १७ हजार २०० रुपये दंड वसूल केला, तर १३३ दुचाकी वाहने जप्त केली.

याशिवाय पोलीस व महापालिका यांच्या संयुक्ततेने राबविलेल्या मोहिमेत शहरात विनामास्क फिरणाऱ्या ३०५ जणांवर कारवाई करत ५८ हजार ४०० रुपये दंड वसूल केला. ही कारवाई तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

फोटो नं. ०६०५२०२१-कोल-पोलीस०१,०२

ओळ : कोल्हापूर शहरात गुरुवारी दुपारी संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांची पोलिसांनी कसून तपासणी केली तसेच काही दुचाकी जप्त केल्या. (छाया : नसीर अत्तार)

===Photopath===

060521\06kol_25_06052021_5.jpg~060521\06kol_26_06052021_5.jpg

===Caption===

फोटो नं. ०६०५२०२१-कोल-पोलीस०१,०२ओळ : कोल्हापूर शहरात गुरुवारी दुपारी संचारबंदीचे उल्लघन करणार्या वाहनधारकांची पोलिसांनी कसून तपासणी केली तसेच काही दुचाकी जप्त केल्या. (छाया: नसीर अत्तार)~फोटो नं. ०६०५२०२१-कोल-पोलीस०१,०२ओळ : कोल्हापूर शहरात गुरुवारी दुपारी संचारबंदीचे उल्लघन करणार्या वाहनधारकांची पोलिसांनी कसून तपासणी केली तसेच काही दुचाकी जप्त केल्या. (छाया: नसीर अत्तार)

Web Title: Action on 1545 vehicles in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.